शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
5
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
6
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
7
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
8
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
9
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
10
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
11
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
12
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
13
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
18
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
19
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
20
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांच्या सोईला दिरंगाईचा लकवा

By admin | Updated: December 3, 2014 00:36 IST

सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून अपंग व अधू व्यक्तींचा विचार आपल्या देशात अजिबात केला जात नाही. अपंगांसाठी अनेक योजना आहेत. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

शाळेतील शौचालये, पुस्तकालये सोयीचे नाहीत : आज जागतिक अपंगदिन
नागपूर : सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून अपंग व अधू व्यक्तींचा विचार आपल्या देशात अजिबात केला जात नाही. अपंगांसाठी अनेक योजना आहेत. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. अनेक शाळांच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करण्यासाठी रॅम्प लिफ्टची सोय नाही. शाळेतील शौचालय, पुस्तकालय इत्यादींमध्ये अपंगांसाठी ते उपयुक्त नसल्याचे चित्र आहे.
अपंगांसाठी अनेक योजना आहेत, पण त्याची अंमलबजावणी होताना कुठे दिसतेय? अशा योजनांचा अपंग व्यक्तींना फायदा पूर्णपणे मिळतोय की नाही, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात की नाही, याची तपासणी केली जात नाही.
अशा योजनांमार्फत दिल्या गेलेल्या सवलतींचा त्यांना काही उपयोग होतो की नाही, याची कोणी विचारपूस करीत नसल्याने अपंग व्यक्ती अनेक सोयींपासून वंचित राहत असल्याचे दिसून येते. साध्या प्रवासाचा विचार केला तर शहरात फ्लोअर बसेस उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्हीलचेअरवर बसलेला अपंग प्रवासी बसमध्ये प्रवेश करू शकत नाही. अंधांना बसस्थानकाची माहिती कळण्यासाठीची उद्घोषणा यंत्रणा कुठेही उपलब्ध नाही. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मची उंचीही विकलांगांसाठी नेहमीच अडचणीची ठरते. अपंगांसाठी सोयीस्कर शौचालयाची तर सगळीकडे गरज आहे. तिकीट-खिडक्यांची उंची जास्त असल्यामुळे बुटक्या, व्हीलचेअर वापरणाऱ्या व अपंग प्रवाशांना तिकीट घेण्यास अडचण होते. रेल्वेच्या अपंगांच्या डब्यात योग्य प्रकारची हॅन्डल्स, बैठक व्यवस्था, मोकळी जागा, उपलब्ध नाही. शासकीय रुग्णालयांमध्ये व कार्यालयात रॅम्प आहेत, पण तिथे त्यांचा उतार योग्य नाही किंवा जास्त असते. तसेच गुळगुळीत टाईल्स असल्यामुळे पाय घसरून पडण्याची भीती असते. विशेष म्हणजे, बहुतेक सरकारी कार्यालयांमध्येही प्रवेश करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नाही. अंधांसाठी ब्रेललिपीत लिहिलेले कामकाजाचे अर्ज अनेकदा उपलब्ध नसतात. उद्यान, शॉपिंग मॉल, इतर फिरण्याच्या ठिकाणीही अपंगांच्या दृष्टीने योग्य काळजी घेतली गेलेली नसते. या समस्या सोडविण्याची मागणी आता सर्व स्तरातून होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)