शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST

रामटेक : पाेलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय ...

रामटेक : पाेलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला पाेलीस कर्मचाऱ्यांचा गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पाेलीस अधिकारी नयन आलूरकर व ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांची उपस्थिती हाेती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठविलेले गाैरवपत्र देऊन महिला पाेलीस, हाेमगार्ड आणि महिला समुपदेशन केंद्राच्या दीपा चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला सर्व महिला पाेलीस व हाेमगार्ड उपस्थित हाेत्या.

....

ग्रामपंचायत सातनवरी

धामणा : परिसरातील सातनवरी ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी सावित्रीबाई फुले, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सविता चाैधरी हाेत्या. यावेळी सरपंच विजय चाैधरी, शैलेश पाटील, अरुणा बहादुरे उपस्थित हाेते. कार्यक्रमात महिला बचत गटाच्या पदाधिकारी, अंगणवाडीसेविकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मनिषा कुंभारे, नूतन मेघे, अंजू डेंगे, अमिता लांजेवार, संगीता पिसे, कविता भाेयर, वैशाली खडसे, द्राैपदी टापरे, नेहा टापरे, प्राजक्ता ढाले आदींची उपस्थिती हाेती.

...

अ. भा. जनवादी महिला संघटना

रामटेक : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. क्लारा झेटकीन यांच्यासह जगातील व देशातील नारीवादी आंदाेलनात समाेर आलेल्या महिलांना अभिवादन करण्यात आले. दिल्लीतील आंदाेलनात सहभागी महिला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीला महिलांनी पाठिंबा दर्शविला. गेल्या काही वर्षांत महिलांवरील वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे सांगून यावर चिंता व्यक्त केली. वाढती महागाई, गॅस, पेट्राेल व डिझेल दरवाढीविराेधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार उपस्थित महिलांनी केला. कार्यक्रमाला कल्पना हटवार, गौराबाई माकडे, मंजुळा टेकाम, शहनाज शेख, कांचन अडकने, वर्षा वानखेडे, अर्चना भगत, बयाबाई बन्साेड, माया वैद्य आदींची उपस्थिती हाेती.

.....

प्रभारी तहसीलदार दराडे यांचा सत्कार

सावनेर : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ सावनेरच्या वतीने महिला दिनानिमित्त प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महासंघाच्या तालुका अध्यक्ष छाया डहाके यांच्या हस्ते प्रभारी तहसीलदार चैताली दराडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गाैरविण्यात आले. यावेळी महासंघाच्या पदाधिकारी स्मिता ठाकरे, कविता पिसे, विविधा उमाटे, वर्षा पर्वते, वैशाली केदार, धीरज ठाकरे, गिरीश डहाके, मोहन खोंडे, पवन भोंगाडे आदी उपस्थित होते.

....

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

कळमेश्वर : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखा कळमेश्वरच्या वतीने लाेणारा येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका विजय उकरे यांचा ‘जिजाऊची लेक सन्मान’ सोहळ्यांतर्गत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी केंद्रप्रमुख अंबादास गिरडकर, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष मुरलीधर सातपुते, सचिव विवेक राऊत, युवराज यावलकर, प्रवीण निमकर, प्रभाकर वंजारी, नितीन पोतले, सरपंच सरला दुपारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण नागपुरे, पोलीस पाटील माया नागपुरे, ग्रा.पं. सदस्य सुषमा नागपुरे, आशा वर्कर मुमताज धनगरे, अंगणवाडीसेविका आशा गवळी आदींची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाच्या आयाेजनासाठी शिक्षिका मंदा गजबे, विजया धोटे, सुनिता उबरहांडे आदींनी सहकार्य केले.