शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे?

By योगेश पांडे | Updated: February 16, 2024 22:32 IST

नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी ...

नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी झाली तेथील रक्तांचे नमुने घेतले असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तेथे आणखी दोन जणांच्या रक्ताचे डाग असल्याची बाबदेखील समोर आली आहे. अशा स्थितीत आता हे नवे डाग कुणाचे आहे या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

सना खानची २ ऑगस्ट २०२३ रोजी जबलपूर येथे आरोपी अमित साहू याने त्याच्या घरी हत्या केली होती. त्यानंतर त्याने सनाचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी मोठी शोधमोहीम राबवूनदेखील मृतदेह सापडला नव्हता. पोलिसांनी या प्रकरणात साहूसह इतर आरोपींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात फॉरेन्सिक तपासणी केली व डीएनए चाचणीदेखील करण्यात आली.

एका चाचणीच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली. तेथे सना खानच्या रक्ताव्यतिरिक्त आणखी दोघांचे रक्तदेखील असल्याचे स्पष्ट झाले. त्यातील एक महिला व एक पुरुष असल्याची माहिती अहवालातून कळाली. आता हे डाग नेमके कुणाच्या रक्ताचे होते याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासंदर्भात परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याला दुजोरा दिला. ते रक्ताचे डाग कुणाचे होते याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी कुणी आरोपी ?सना खानची हत्या झाली त्यावेळी तेथे अमितव्यतिरिक्त आणखी कुणी आरोपी उपस्थित होते का याची पोलीस चौकशी करत आहेत. सना खानला मारहाण करत असताना आरोपी जखमी होऊन रक्त सांडले असल्याचीदेखील शक्यता आहे. या प्रकरणात एका मोलकरणीने सना खानचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहिला होता. मात्र नंतर ती महिला गायब झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला सापडली असून तिची चौकशी सुरू आहे. 

 

टॅग्स :sana khanसना खानCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरBJPभाजपा