शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरकर विद्यार्थ्याला भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यादरम्यान मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 22:18 IST

Nagpur News प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी चालत चालत बांगलादेशला पोहोचलेल्या २० वर्षीय नागपुरकर विद्यार्थ्याला बांगलादेशमध्ये मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली.

ठळक मुद्देप्लास्टिक जनजागृतीसाठी सुरू आहे भ्रमंती

योगेश पांडे

नागपूर : प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी चालत चालत बांगलादेशला पोहोचलेल्या २० वर्षीय नागपुरकर विद्यार्थ्याला बांगलादेशमध्ये मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली. भारत-बांगलादेशदरम्यान मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. रोहन अग्रवाल असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव असून तेथील सुरक्षायंत्रणेने सहकार्य न केल्याने अखेर त्याने स्वत:च फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपबिती मांडली.

८ ऑक्टोबरपासून रोहन बांगलादेशमध्ये आहे. तेथे तो विविध ठिकाणी फिरून प्लास्टिकचे धोके व भविष्यातील दुष्परिणाम यांच्याबाबत जागृती करतो आहे. तो क्रिकेटचादेखील फॅन असून तो एकदिवसीय सामना पाहण्यासाठी बुधवारी मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर पोहोचला. त्याच्यासोबत त्याचे तेथील काही परिचितदेखील होते. सामन्यादरम्यान तो भारतीय संघाचे समर्थन करत होता. त्याचवेळी बांगलादेश समर्थकांनी त्याच्याशी वाद घातला व त्याला मारहाण केली. भारतासाठी घोषणा दिल्या तर जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. रोहनने याची तेथील सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली. मात्र त्याला कुणीच गंभीरतेने घेतले नाही. अखेर त्याने मैदानाबाहेर निघाल्यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रकार मांडला. यासंदर्भात त्याने बांगलादेश येथील भारतीय दुतावासालादेखील कळविले आहे.

दोन महिन्यांपासून बांगलादेशमध्ये जागृतीमुळचा नागपुरकर असलेला रोहन हा सिक्कीम येथील विद्यापीठात शिक्षण घेत आहे. प्लास्टिकसंदर्भात जनजागृतीसाठी त्याने कोरोना काळापासून जागृती सुरू केली. सुमारे ६५० दिवसांत त्याने भारतातील २७ राज्यांचा प्रवास केला. ८ ऑक्टोबर रोजी तो बिलोनिया सीमेमार्गे बांगलादेशमध्ये दाखल झाला. तेथे विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी जाऊन तो जागृती करत आहे. अशा तरुणाला मारहाण झाल्याने सोशल मीडियावरदेखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी