शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Violence: बाहेरून लोकं आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार; भाजपा आमदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 22:32 IST

Aurangzeb Tomb Row: नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

Nagpur Violence: नागपूर येथे झालेल्या २ गटातील तणावाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. विरोधकांनी या प्रकाराला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना निंदनीय आहेत. सगळ्यांनी एकत्रित राहिले पाहिजे. आपण संविधानाला मानणारे लोक आहोत. मुख्यमंत्र्‍यांचं शहर जळत असेल तर त्याला काय अर्थ नाही. क्षुल्लक कारणावरून एकमेकांना भडकवणं थांबवले पाहिजे. महाराष्ट्र जपा असं सांगत काँग्रेस महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

'त्या' मंत्र्‍याची हकालपट्टी करा

नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेले आहे. हे सगळं मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणे, भांडण लावणे हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत. नागपूरकरांनी शांतता बाळगावी, कोणताही गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी असं आवाहन करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

बाहेरून लोक आणून प्लॅनिंगनं घडवला प्रकार

सकाळी परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र काही बाहेरचे लोक आणून दगडफेक, जाळपोळ केली. दंगलखोरांना पोलीस पकडत आहेत. बाहेरून लोक आणून काहींनी नियोजनपद्धतीने हा प्रकार घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी केला. 

दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ज्या लोकांनी ही दगडफेक केली त्यांना ताब्यात घेत आहोत. आतापर्यंत १०-१५ लोकांना ताब्यात घेतले आहे. ज्या लोकांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतला त्यांना ताब्यात घेतले जात आहे. कुठल्याही अफवेला बळी पडू नका. आम्ही रस्त्यावर आहोत. सर्व नियंत्रणात आणत आहोत असं आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी लोकांना केले आहे. 

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरBJPभाजपाNagpur Policeनागपूर पोलीसCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रShivjayantiशिवजयंती