नागपूर हादरले ! बंद घरात आढळला आई-मुलीचा मृतदेह; आत्महत्या की आणखी काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:33 IST2026-05-07T15:30:09+5:302026-05-07T15:33:17+5:30

Nagpur : गाडगेनगरातील एका बंद घरामध्ये आई-मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसले, तरी ही आत्महत्या आहे की काय, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Nagpur shaken! Mother-daughter bodies found in locked house; Suicide or something else? | नागपूर हादरले ! बंद घरात आढळला आई-मुलीचा मृतदेह; आत्महत्या की आणखी काही?

Nagpur shaken! Mother-daughter bodies found in locked house; Suicide or something else?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
गाडगेनगरातील एका बंद घरामध्ये आई-मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसले, तरी ही आत्महत्या आहे की काय, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आश्चर्याची बाब म्हणजे, काही दिवसांअगोदर नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतच आणखी एका मायलेकीने आत्महत्या केली होती.

तुळसाबाई माधवराव वाढई (६५, गाडगेनगर) आणि संगीता माधवराव वाढई (४८) अशी मृतक आई-लेकीची नावे आहेत. दोघीही २ मे रोजी घराजवळ दिसल्या होत्या. त्यानंतर, त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. उन्हाळ्याचे दिवस असतानाही त्यांच्या घरातील कूलरही बंद होता. त्यांचा मुलगा नीलेश हा गुजरातमधील अहमदाबाद येथे नोकरीला आहे. त्याचेदेखील २ मे रोजी तुळसाबाई यांच्याशी अखेरचे बोलणे झाले होते. त्यानंतर, त्याचा त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. त्याने इतर नातेवाइकांना विचारणा केली. मात्र, त्यांनाही काहीच कल्पना नव्हती. अखेर प्रत्यक्ष घरी नातेवाईक गेल्यावर दरवाजा बंद दिसला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता, दोघीही मृतावस्थेत पडलेल्या दिसून आल्या.

फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी

दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले, तसेच फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. दोघींचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्टता येऊ शकलेली नाही. मात्र, ही आत्महत्या आहे का, या दिशेने चौकशी करण्यात येत आहे.

१ मे रोजी व्यंकटेशनगरात संगीता श्रीराम ढबाले (५२) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (२९) यांनी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात आकांक्षाच्या पतीसोबत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title : नागपुर में सनसनी: माँ और बेटी मृत पाई गईं; आत्महत्या का संदेह

Web Summary : नागपुर में एक घर में माँ और बेटी मृत पाई गईं, जिससे आत्महत्या का संदेह पैदा हो गया है और पुलिस जांच कर रही है। मृतकों की पहचान तुलसी और संगीता वाधाई के रूप में हुई है। इसी क्षेत्र में एक समान घटना के बाद यह खोज हुई है, जिससे चिंता बढ़ गई है। फोरेंसिक टीमें मौत के कारणों की जांच कर रही हैं।

Web Title : Nagpur Shaken: Mother and Daughter Found Dead; Suicide Suspected

Web Summary : A mother and daughter were found dead in their Nagpur home, prompting a police investigation into suspected suicide. The deceased were identified as Tulsa and Sangeeta Wadhai. The discovery follows a similar incident in the same area, raising concerns. Forensic teams are investigating the cause of death.