शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात नागपूर होणार ‘टुरिझम सिटी’

By admin | Updated: September 9, 2016 03:08 IST

राज्य शासनाने पर्यटन विकासाला चालना दिली आहे. याअंतर्गत नागपूर शहराला प्राधान्य दिले जात आहे.

पालकमंत्री बावनकुळे यांचा विश्वास : केंद्र व राज्य सरकारची भरघोस मदत नागपूर : राज्य शासनाने पर्यटन विकासाला चालना दिली आहे. याअंतर्गत नागपूर शहराला प्राधान्य दिले जात आहे. केवळ घोषणाच नाही तर निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जात आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने नागपूर शहर येत्या चार वर्षात पर्यटन सिटी म्हणून देशातच नव्हे तर जगात ओळख निर्माण करेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला. रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की, नागपुरात बुद्धिस्ट सर्किट तयार करून त्याचा विकास केला जात आहे. यात दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस आणि शांतिवन चिचोली हे एकमेकांशी जोडले जातील. यासाठी राज्य शासनाने ७०७ काटीचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र सरकारने सुद्धा स्वदेश दर्शन अंतर्गत याला १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यासोबतच धापेवाडा-दासा-पाटणसावंगी आणि कोराडी सर्किट सुद्धा तयार केले जात आहे याला सुद्धा केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कोराडी येथे ‘वॉटर टुरिझम’ तयार केले जात आहे. ६०० एकर परिसरात हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर साकारण्यात येत आहे. १८७ कोटीचा हा प्रकल्प आहे.या प्रकल्पाचे प्रेझेंटेशनही बावनकुळे यंनी यावेळी सादर केले. या प्रकल्पात कोराडी मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे. अत्याधुनिक बस स्टॅण्ड, पर्यटन केंद्र, २५० दुकानांचे शॉपिंग कॉम्प्लेक्स, तब्बल १३ एकर परिसरात बगिचा, त्रिकोणी पार्क, भक्त निवास, फेस्टीव्हल ग्राऊंड, चौपटी आदी करण्यात येईल. येथे एक भव्य म्युझियम राहील. त्यात देशाच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविले जाईल. येथील तलावात बोटिंग व साहसी खेळांचा समावेश राहील. तसेच रोप-वे ची व्यवस्था सुद्धा राहील. वॉटर स्पोटर््स राहतील.याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल आणि दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक पीयूष कुमार उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोराडी सी-प्लेनने देशाशी जुळणार यासोबतच कोराडी हे सी-प्लेनने देशातील प्रमुख शहराशी जोडण्यात येईल. अंबाझरी, कोराडी आणि खिंडसी हे अंतर्गत सी-प्लेनने जुळणार आहेत. कोराडीत साकारणार ‘शिल्पग्राम’ कोराडी येथे तब्बल १०० एकर परिसरात शिल्पग्राम साकारण्यात येणार आहे. यामध्ये भारताच्या संस्कृतीवर आधारित शिल्प साकारण्यात येतील. हा संपूर्ण प्रस्ताव दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक पीयूष कुमार यांनी तयार केला असून तो केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. कालडोंगरी येथे साकारणार फिल्मसिटीयासोबतच नागपुरात फिल्मसिटी तयार होऊ शकते. यासाठी कालडोंगरी येथे ४५० एकर परिसरात फिल्मसिटी तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.