शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मदर तेरेसा यांना ‘संत’ पद, नागपुरात जल्लोष

By admin | Updated: September 5, 2016 02:52 IST

आधार नसलेल्या दीनदु:खितांसाठी कार्य क रणाऱ्या मदर टेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आले.

शांतिभवनात मिठाई वाटून आनंद साजरा : टीव्हीवर पाहिला संतपद बहालीचा सोहळानागपूर : आधार नसलेल्या दीनदु:खितांसाठी कार्य क रणाऱ्या मदर टेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आले. व्हेटिकन सिटी, रोम येथे झालेल्या भव्य सोहळ््यात पोप फ्रान्सिस यांनी त्यांना मरणोत्तर संत ही उपाधी बहाल केली. नागपुरातही संत मदर टेरेसा यांच्या चाहत्यांनी उत्सव साजरा केला. अपंग, मतिमंद, वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या शांतिभवन येथील केंद्रात मिठाई वाटून हा आनंद व्यक्त क रण्यात आला.मदर टेरेसा यांच्या कोलकाता येथील मुख्य केंद्राशी संलग्नित असलेल्या शांतिभवन येथे रविवारी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. येथे सेवाकार्य करणाऱ्या सिस्टर आणि आश्रयात असलेले निराधार व्हेटिकन सिटी येथे होणारा सोहळा पाहण्यासाठी दुपारपासून टीव्हीसमोर बसले होते. दुपारी २ नंतर पोप यांनी संतपद बहाल करण्याची घोषणा करताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद तरळला. शांतिभवनच्या आवारात सर्वजण गोळा झाले आणि एकमेकांना मिठाई भरवण्यात आली. सोबतच ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून मदर टेरेसा यांच्या संतपदाचा आनंद व्यक्त करण्यात आला. शांतिभवन येथे आश्रयात असलेले आजारी, अपंग, मतिमंद, वृद्धांसमवेत हा आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी शंतिभवनच्या प्रमुख रेव्हरन सिस्टर जोसिका, सिस्टर डॅनियल, फिलीप जोसेफ, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव, नेल्सन फ्रान्सिस, चार्ल्स फ्रान्सिस, क्लेमंड जोसेफ, राजेश क्रॉस, संजय फ्रान्सिस, सिल्वेस्टर राव, जॉन जोसेफ, जॉन झेव्हियर, माजी नगरसेवक राजेश माटे आदी उपस्थित होते. मदर टेरेसा यांचे कार्य अवघ्या जगाला प्रेरणा देणारे आहे. दीनदुबळ््यांमध्ये देव असल्याचा विचार करत त्यांनी आजीवन अशा वंचित घटकांची सेवा केली. आजारी, आधार नसलेले, उकिरड्यावर जगणाऱ्यांना आश्रमात आणून त्यांना मायेचा आधार दिला. जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांनी हे कार्य केले. त्या हयात नसतानाही त्यांचे कार्य देशभरात सुरू आहे. त्यातीलच एक केंद्र म्हणजे शांतिभवन. त्यामुळे ईसाई धर्माचे सर्वोच्च आस्था केंद्र व्हेटिकन सिटी येथे पोप यांनी मदर टेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केल्याने सेवेचे व्रत घेऊन कार्य करणाऱ्यांचा आनंद अलौकिक असा आहे. मदर टेरेसा १९९० साली एका दिवसासाठी नागपूरला आल्या होत्या व त्यांनी शांतिभवनला भेट दिली होती. त्या दिवसाच्या आठवणी ताज्या झाल्याच्या भावना शांतिभवन येथे सेवा देणाऱ्यांनी व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)