शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार घेणार सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: December 4, 2015 02:57 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे राज्यातील काही आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

अधिवेशन काळात वेळ घेण्याचा प्रयत्न सुरू : मार्गदर्शन घेण्याचा मानसनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजपचे राज्यातील काही आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. डॉ. भागवत यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी या आमदारांची इच्छा असून त्यांचा वेळ मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात ही भेट होण्याची शक्यता आहे.हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार तीन आठवडे नागपुरात राहणार आहेत. यावेळी अनेक आमदार रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. मागील वर्षी अधिवेशनाअगोदरच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसमवेत अनेक आमदारांनी येथे भेट दिली होती. यावेळी त्यांना संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात आले होते. परंतु यावेळी सरसंघचालकांसोबत आमदारांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे संघभूमीत परत येत असताना सरसंघचालकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी भाजपच्या काही आमदारांचा प्रयत्न सुरू आहे. सद्यस्थितीत डॉ. भागवत हे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या ४ दिवसांत तर त्यांची भेट होण्याची शक्यता नाही. परंतु १० तारखेनंतर ते नागपुरात येण्याची दाट शक्यता असून अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांची वेळ मिळते का याची आमदारांकडून चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात संघाच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारणादेखील झाली आहे. परंतु अद्याप भेटीसंदर्भात निश्चिती झालेली नाही, अशी माहिती एका भाजपाच्या आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. जर सरसंघचालक नागपुरात असले आणि ते व्यस्त नसले तर निश्चितच ते आमदारांना भेटतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)