शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

Maharashtra Assembly Election 2019 :विश्वास ठेवा, दिलेली आश्वासने १०० टक्के पूर्ण करेन : आशिष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 9:50 PM

लोकमत न्यून नेटवर्क नागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी ...

ठळक मुद्देमहारॅलीने झाली प्रचाराची सांगता

लोकमत न्यून नेटवर्कनागपूर : नागपूर शहर पारंपरिकरीत्या काँग्रेसच्या विचारसरणीवर चालणारे आहे. फुले, शाहू, आंबेडकर व महात्मा गांधींची विचारसरणी हीच काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यामुळे नागपूरची जनता पुनश्च काँग्रेससोबत उभी राहिलेली दिसेल, असा विश्वास व्यक्त करीत विकासाचे मिशन, व्हिजन, इज ऑफ लिव्हिंग यासंदर्भात आपण लोकांना दिलेली वचने १०० टक्के पूर्ण करू, असे आश्वासन दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. आशिष देशमुख यांनी दिले.

शनिवारी १९ ऑक्टोबरला सकाळी दीक्षाभूमी येथून डॉ. आशिष देशमुख यांच्या महारॅलीला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत मुकुल वासनिक, प्रकाश गजभिये, प्रफुल्ल गुडधे पाटील, राकेश पन्नासे आदींसह जनसमुदाय उपस्थित होता. या महारॅलीने नीरी, अजनी, लोकमत चौक, धंतोली, घाट रोड, गणेशपेठ बसस्टँड, जाटतरोडी, आंबेडकर चौक, पार्वतीनगर, शताब्दी चौक, मनीषनगर व लगतचा परिसर दणाणून सोडला.जनसंपर्कादरम्यान देशमुख म्हणाले, आर्थिक संपन्नता प्रत्येक घरापर्यंत पोहचविणे हा आपला शब्द आहे. आपण नागपुरात राहणारे उमेदवार आहोत, त्यामुळे जनतेच्या नेहमी संपर्कात राहणार आहे. समस्या जाणून सोडविण्यासाठी आणि नागपूरच्या विकासासाठी प्रत्येक दिवस काम करणार आहे.ते पुढे म्हणाले, भारताची अर्थव्यवस्था घसरली. चुकीच्या पद्धतीने लागू केलेली जीएसटी, नोटाबंदी यामुळे व्यापारीवर्ग भाजपवर नाराज आहे. रोजच्या मिळकतीमध्ये घट झाल्यामुळे या वर्गाचा भाजपाच्या धोरणांवर रोष आहे. एकूण मतदारांपैकी ५० टक्के मतदार ३५ वर्षांखालील आहेत. भाजपकडे वळलेला तरुण मतदार बेरोजगारीमुळे कमालीचा त्रस्त आहे. स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मुद्रा योजना यातून त्यांच्या हाताला काम मिळाले नाही. त्यांचा स्वयंरोजगार सुरू झाला नाही. या सर्व समस्यांवर आपल्या व्हिजनमध्ये उत्तर असल्याचे सांगत, त्यांनी मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashish Deshmukhआशीष देशमुखnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम