महाल दंगलीतील आरोपी फहीम खानला अटक; पाचपैकी एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:09 IST2026-05-02T15:09:05+5:302026-05-02T15:09:56+5:30

Nagpur : मागील वर्षी मार्च महिन्यात महालात झालेल्या दंगलप्रकरणातील आरोपी व एमआयएम नगरसेविका अलिसा खान यांचा पती फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे.

Mahal riot accused Fahim Khan arrested; Arrested for investigation of one of the five crimes | महाल दंगलीतील आरोपी फहीम खानला अटक; पाचपैकी एका गुन्ह्याच्या चौकशीसाठी अटक

Mahal riot accused Fahim Khan arrested; Arrested for investigation of one of the five crimes

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मागील वर्षी मार्च महिन्यात महालात झालेल्या दंगलप्रकरणातील आरोपी व एमआयएम नगरसेविका अलिसा खान यांचा पती फहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

मागील वर्षी १७ मार्च रोजी महाल परिसरात दंगल उसळली होती. त्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंगदेखील करण्यात आला होता व मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. त्यात काही पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमीदेखील झाले होते. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) फहीम खान हा या दंगलीचे सूत्रधार असल्याची बाब समोर आली होती. त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तातडीने त्याचे घरदेखील पाडण्यात आले होते.

पोलिसांनी तेव्हा फहीमला अटकदेखील केली होती. मात्र, त्याच्याविरोधात गणेशपेठमध्ये एक व तहसील पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल झाले होते. त्यातील एका गुन्ह्यात त्याला अटक झाली नव्हती. त्या प्रकरणाचा तपास तहसील पोलिस ठाण्यातून आर्थिक शाखेकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणात सुरुवातीला आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात फहीमला अटक न झाल्याने प्रश्न उपस्थित होत होते. अखेर तहसील पोलिस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री फहीमला ताब्यात घेतले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत घेतले जाईल. 

संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ

दरम्यान, फहीम खानला अटक झाल्यानंतर त्याचे निवासस्थान तसेच संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. त्याचे समर्थक गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

गणेशपेठ पोलिसांनीदेखील केली होती अटक

दरम्यान, दोन आठवड्यांअगोदर फहीमला गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या पथकानेदेखील अटक केली होती. मानकापूर येथील एका वादाच्या प्रकरणात त्याचे नाव आले होते. त्याचे नाव दंगलीतील गुन्ह्यात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीतदेखील झाली होती.

Web Title : महाल दंगा मामले में फहीम खान गिरफ्तार; जांच जारी

Web Summary : पिछले साल के महाल दंगों के आरोपी और एमआईएम पार्षद अलीसा खान के पति फहीम खान को गिरफ्तार किया गया है। उन पर महिला पुलिस अधिकारियों पर हमला और संपत्ति को नुकसान पहुंचाने सहित कई मामले दर्ज हैं। यह गिरफ्तारी तहसील पुलिस स्टेशन में उनके खिलाफ दर्ज पांच मामलों में से एक की आगे की जांच के लिए है।

Web Title : Fahim Khan Arrested in Mahal Riot Case; Investigation Ongoing

Web Summary : Fahim Khan, accused in last year's Mahal riots and husband of MIM corporator Alisa Khan, has been arrested. He is implicated in multiple cases, including an attack on female officers and property damage. This arrest is for further investigation into one of the five cases registered against him at the Tehsil police station.