शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वनांना आपले समजा, तरच वनसंपदा वाचेल!

By admin | Updated: October 9, 2016 02:31 IST

वन ही खुली संपत्ती आहे. त्यामुळे लोकांनी वनांना आपल्या पुढील पिढीची संपत्ती समजून त्याचे संरक्षण केले पाहिजे तरच वनसंपदा वाचेल.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांच्याशी विशेष संवाद
योगेंद्र शंभरकर नागपूर
वन ही खुली संपत्ती आहे. त्यामुळे लोकांनी वनांना आपल्या पुढील पिढीची संपत्ती समजून त्याचे संरक्षण केले पाहिजे तरच वनसंपदा वाचेल. पर्यावरणाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे. तसेच वनांच्या संरक्षणासाठी वाघ आवश्यक आहे. जंगलातील प्रत्येक छोट्या-मोठ्या वन्यजीवांसह नैसर्गिक जैवविविधतेचे विशेष महत्त्व असल्याचे मत राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री भगवान यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत व्यक्त केले.
पीसीसीएफ श्री भगवान आपल्या मृदु स्वभावासाठी वन विभागात परिचित आहे. त्यांनी १९९८ मध्ये ताडोबा येथे मुख्य वनसंरक्षक पदावर असताना देशात सर्वप्रथम गाईड प्रथा सुरू केली होती. त्यांच्या मते, या माध्यमातून जंगलाशेजारच्या गावातील तरुणांना रोजगार मिळावा, हा त्यामागील उद्देश होता. गावातील तरुणांना जंगलाच्या माध्यमातून रोजगार मिळाला तर त्यांच्यामध्ये जंगलाची सुरक्षा करण्याची भावना निर्माण होईल.
आजही आपण त्याच विचारावर ठाम असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कदाचित यामुळेच भगवान यांनी मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात जंगल सफारी बंद ठेवण्याची प्रथा मोडित काढली आहे. पावसाळ्यात व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यातील जंगल सफारी बंद केल्यास तेथील जिप्सी चालक तथा गाईड बेरोजगार होईल, आणि त्यांच्या समोर कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रश्न उभा ठाकेल. यात कुणी शिकाऱ्यांच्या प्रलोभनाला बळी पडून चुकीचे काम सुद्धा करू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात पक्क्या रस्त्यांनी जंगल सफारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे भगवान यांनी स्पष्ट केले.
श्री भगवान यांची १९८३ मध्ये पहिली नियुक्ती ही आलापल्ली येथील अतिदुर्गम वनक्षेत्रात झाली होती. यानंतर त्यांनी तब्बल सहा वर्षे गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात काम केले. त्यांनी वनसंरक्षक असताना वाहनगस्ती ऐवजी पायी गस्तीलाच महत्त्व दिले. त्यांच्या मते, वाहनगस्तीपेक्षा पायी गस्तीचा अधिक फायदा होतो.

निसर्ग सृष्टीचा आनंद घ्या
श्री भगवान म्हणाले, अनेक पर्यटक वाघाचे दर्शन होताच जंगलातून काढता पाय घेतात. परंतु जंगलात केवळ एकटा वाघच राहत नाही, तर तेथे अनेक दुसरे वन्यजीव सुद्धा राहतात. त्यामुळे पर्यटकांनी त्या वन्यप्राण्यांसह निसर्ग सौदर्य पाहण्याचा आनंद लुटला पाहिजे. शिवाय वाघाचे विश्व फार मोठे आहे. त्यामुळे त्याला समजून घ्यायला अनेक वर्षे लागतात.

प्रत्येकाची स्वतंत्र ओळख असावी
प्रशासनात काम करताना कोण कोणत्या राज्यातील आहे, याला मी कधीच विचार केला नाही. तर केवळ माणसाला महत्त्व दिले आहे. मात्र प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असली पाहिजे. त्यासाठीच आपण १९७० मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण होताच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपल्या नावामागील आडनाव हटविले. तेव्हापासून कुणीच आडनावाने ओळखत नसून, केवळ श्री भगवान अशी ओळख निर्माण झाली आहे.

श्री भगवान यांचे गुपित
राज्याचे पीसीसीएफ श्री भगवान यांचा बिहारमधील पाटणा येथे जन्म झाला असून, तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. यानंतर त्यांनी दिल्ली येथे उच्च शिक्षण घेतले. शिवाय फेब्रुवारी १९८१ मध्ये त्यांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर झालेल्या मुलाखतीत त्यांना भारतीय वन सेवा आणि जंगलाविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु श्री भगवान यांनी कधीच जंगल बघितले नव्हते. मात्र त्यांची भारतीय वन सेवेसाठी निवड झाली. हीच परमेश्वराची इच्छा होती, असे यावेळी श्री भागवान यांनी सांगितले.