शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तछायाचित्रकारांमधील एकोपा कायम असू द्या

By admin | Updated: August 20, 2016 02:26 IST

आज देशाची लोकसंख्या १२० कोटी असेल तर यातील १०० कोटी लोक सेल्फीच्या माध्यमातून फोटोग्राफर बनले आहेत.

गिरीश गांधी : उदय वैतागे स्मृती पुरस्कार वितरण नागपूर : आज देशाची लोकसंख्या १२० कोटी असेल तर यातील १०० कोटी लोक सेल्फीच्या माध्यमातून फोटोग्राफर बनले आहेत. परंतु तरीही वृत्तछायाचित्रकाराला जे दिसते ते कुणालाही दिसणे शक्य नाही. म्हणूनच वृत्तछायाचित्रकाराचे विशेष महत्त्व आहे. काळ स्पर्धेचा असला तरी वृत्तछायाचित्रकारांनी परस्परातील एकोपा कायम जपावा, असे आवाहन वनराईचे संस्थापक डॉ. गिरीश गांधी यांनी केले. नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन आणि वनराई फाऊंडेशनतर्फे आज शुक्रवारी जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त राष्ट्रभाषा संकुलात आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर वाहतूक पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड, नागपूरचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, देवेंद्र कस्तुरे, अजय पाटील, नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश टिकले व सत्कारमूर्तीद्वय बाळाभाऊ नागभीडकर आणि शामकांत सेलोकर उपस्थित होते. नागपूरच्या वृत्तछायाचित्राच्या क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल बाळाभाऊ नागभीडकर आणि शामकांत सेलोकर यांना यावेळी उदय वैतागे स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्मार्तना पाटील, मोहन राठोडव देवेंद्र कस्तुरे यांनीही आपल्या भाषणातून नागपुरातील वृत्तछायाचित्रकारांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. याप्रसंगी वाहतूक पोलीस शाखेतील काही कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मुकेश कुकडे तर आभार मोनिका चतुर्वेदी हिने मानले.(प्रतिनिधी)