शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेचा जालीम उपाय; बेमुर्वतखोर प्रवाशांना धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 23:11 IST

ट्रेन किंवा रेल्वे स्थानकावर घाण केल्यास 'सफाई'ची शिक्षा

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : छोट्या मोठ्या रकमेच्या दंडाला बेशिस्त जुमानत नसल्याने त्यांना वठणीवर आणण्यासाठी भारतीय रेल्वेने एक जालीम उपाय शोधला आहे. त्यानुसार, आता रेल्वे स्थानकावर घाण करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी केलेली घाण स्वत:च साफ करावी लागणार आहे. बेमुर्वतखोर प्रवाशांना धडा शिकविण्यासाठी, त्यांच्यात बदल घडविण्यासाठी ही शिक्षा दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी आज चर्चेअंती स्पष्ट केले आहे.

रेल्वे गाड्या आणि रेल्वे स्थानक परिसरात जागोजागी स्वच्छतेचा संदेश बघायला मिळतात. 'कृपया घाण, कचरा करू नका. स्वच्छता राखा', असे हे संदेश असतात अन् त्यासोबतच 'रेल्वे गाड्यात, स्थानकावर, परिसरात घाण कचरा करणे, धूम्रपान करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते,' असेही नमूद असते. मात्र, त्याला अनेक बेपर्वा प्रवासी जुमानत नाही, ते बिनधास्त खर्रा, पान खाऊन जागोजागी पिचकाऱ्या मारतात. विड्या, सिगारेटचे धूर तोंडातून सोडून उग्र दर्प पसरवतात. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतात. अशा बेशिस्त प्रवाशांपैकी मोजक्या जणांना पकडून आरपीएफ किंवा जीआरपीचे जवान त्यांच्यावर दंड ठोकतात. ही रक्कम किरकोळ, अर्थात २०० रुपये असल्याने प्रवासी त्याला जुमानत नाही. ते पुन्हा पुन्हा हा गुन्हा करतात. ते लक्षात घेऊन आता अशा प्रवाशांना धडा शिकविण्यासाठी दंड आकारण्याऐवजी ‘सार्वजनिक सेवा’ करण्याची शिक्षा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

‘जन विश्वास २.० संशोधन विधेयक २०२६’ अंतर्गत ही 'दंड आणि कम्युनिटी सर्विस’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे अशा किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंग किंवा दंडाच्या शिक्षेऐवजी त्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर केलेली घाण साफ करण्याची शिक्षा वजा सेवा देण्यात येणार आहे.

अधिकारी म्हणतात...

"प्रवाशांच्या वर्तनात सकारात्मक बदल व्हावा, असा या निर्णयामागे उद्देश आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप 'ऑफिशियल' असे काही प्राप्त झाले नाही. त्यामुळे 'सफाईच्या शिक्षे'ची अंमलबजावणी नेमकी कधी सुरू होणार, ते स्पष्ट नाही."-अमन मित्तल, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर

"आज हे वृत्त कळले. यासंबंधीच्या कायदेशीर बाबी आम्ही (आरपीएफ) हाताळू. मुख्य जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची राहणार आहे."-दीपचंद्र आर्य, विभागीय सुरक्षा आयुक्त, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Railways' stern action: Unruly passengers to clean up their mess.

Web Summary : Indian Railways introduces a novel punishment for littering: offenders must clean their mess. Instead of fines, 'community service' will be implemented under 'Jan Vishwas 2.0'. The aim is positive behavioral change, though implementation details are pending.
टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर