शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिऱ्यांच्या लखलखाटात ‘इंट्रिया’चे उद्घाटन

By admin | Updated: October 9, 2016 02:20 IST

हिऱ्याचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे.

पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम : प्रदर्शनाला अनेक मान्यवरांची भेट
नागपूर : हिऱ्याचे माणसाला कायम आकर्षण असते. हिरा हा सौंदर्याचा, कलात्मकतेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. आधीच मोहक असलेल्या हिऱ्याला पैलू पाडून कलात्मक दागिने तयार केले तर कुणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही. लखलखत्या दागिन्यांची अनोखी झळाळी आणि नावीन्यपूर्ण असा हिरेजडित दागिन्यांचा आविष्कार पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आहे. स्वर्गीय सौंदर्याची अनुभूती देणाऱ्या जडजवाहिरांचे ‘इंट्रिया’ हे प्रदर्शन शनिवारपासून लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत सुरू झाले. सणासुदीचा आनंद द्विगुणित करणारे दागिने ही ‘इंट्रिया’ची खास ओळख. प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा कोठारी व हिरे व्यापारी हर्निश शेठ यांच्या कल्पना-कौशल्यातून आविष्कृत झालेल्या दागिन्यांचे हे प्रदर्शन आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी इंट्रियाच्या संचालक आणि सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा -कोठारी, इंट्रियाचे भागीदार आणि हिऱ्यांचे व्यापारी हर्निश शेठ प्रामुख्याने उपस्थित होते. या समारंभाला दर्डा परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीमती तारादेवी चोरडिया, जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा, कोषाध्यक्ष अनुजा छाजेड, डॉ. अनिता दर्डा, किरण दर्डा, नीना जैन, विनीता चोरडिया, निकिता दर्डा, डॉ. शैला गांधी, उषा सुराणा, सरोज भंडारी, साक्षी भंडारी, श्रद्धा सिंग, दीपा संघवी जकी, रितु जैन, सेजल शाह आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
अत्यंत आगळेवेगळे असे हिऱ्यांचे सृजनात्मक कलात्मकतेचे दागिने हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. त्यातील डिझाईन्स व अनोखे रचनाकौशल्य मनाला भावल्याखेरीज राहात नाही. अन्यत्र कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशा प्रकारच्या काही अत्युत्तम रचना या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी प्रत्येक दागिन्यांच्या डिझाईन्सवर आणि त्याच्या कलाकुसरीवर हिऱ्यांच्या दागिन्यांवर प्रेम करणारे रसिक लुब्ध झाले. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात दिवाळी आणि सणासुदीच्या मुहूर्तावर उत्कृष्ट कलात्मकतेसह संस्कृती आणि परंपरांचा अनोखा मेळ साधणारे डिझाईन्स प्रदर्शित करण्यात आले आहेत.(प्रतिनिधी)

प्रत्येक दागिना स्टायलिश आणि डिफरंट
या प्रदर्शनातील दागिन्यांची विशेषता सांगताना डिझायनर पूर्वा कोठारी म्हणाल्या, इंट्रियाचा प्रत्येक दागिना हा स्टायलिश आणि डिफरंट असावा याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. अगदी पारंपरिक दागिन्यांपासून ते इंडो-वेस्टर्न, पार्टी वेअर अशा स्वरूपाचे दागिने या प्रदर्शनात सादर करण्यात आले आहेत. प्रदर्शनातील दागिने व्हाईट गोल्ड, येलो गोल्ड आणि पिंक गोल्डने तयार केले आहेत. यात इअररिंग्ज, रिंग्ज, कंठहार, कफलिंग्ज आणि ब्रायडल सेट्स यांचा समावेश आहे. यासोबतच बर्मीस रुबीज् (माणिक) आणि इमरलँडस् (पन्ना) जोडून अत्यंत भव्य रूप देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. जास्तीतजास्त वेळ कम्फर्टेबली हिऱ्यांचे कलात्मक दागिने घालता यावे म्हणून ‘लाईट वेट’ दागिन्यांची शृंखला आम्ही सादर केली आहे. शिवाय यावेळी ग्राहकांच्या बजेटकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे़ इंट्रियाचे हिऱ्यांचे दागिने केवळ लग्न समारंभच नव्हे तर प्रत्येक प्रसंगात सहजपणे घालता येतील असे आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली प्रशंसा
इंट्रिया प्रदर्शनात यंदा हिऱ्यांच्या दागिन्यांची कुठली शृंखला सादर करण्यात येणार याबाबत बरेच कुतूहल होते. यामुळे पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज दिवसभर प्रदर्शनाला भेट देणाऱ्या हिरे प्रेमींनी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी फुलली होती. या प्रदर्शनाला सायंकाळपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन दागिन्यांच्या डिझाईन्सची प्रशंसा केली. यात उद्योगपती, डॉक्टर्स मंडळी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, कला क्षेत्रातील मान्यवर, फॅशन जगतातील मंडळींचा सहभाग होता.

प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस
दिवाळी आणि सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आयोजित हे प्रदर्शन सीमित कालावधीसाठी आहे. हे प्रदर्शन रविवारी ९ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ८ वाजतापर्यंत नागपूरकरांसाठी सुरू राहणार आहे.