शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणालाही संवेदनेचा अर्थ देणारे चित्रशिल्पप्रदर्शन

By admin | Updated: June 14, 2015 03:13 IST

इतरांसाठी साधा दगडच आहे. पण शिल्पकाराला त्यात मूर्ती दिसते, चित्रकाराला त्यात आकार जाणवतो.

सिस्फाचा मान्सून बोनान्झा : प्रमोदबाबू रामटेके यांच्या कलाकृती नागपूर : इतरांसाठी साधा दगडच आहे. पण शिल्पकाराला त्यात मूर्ती दिसते, चित्रकाराला त्यात आकार जाणवतो. त्यातही प्रतिभावंत कलावंत असेल तर दगडातही त्याला भावना, संवेदना दिसतात. सामान्यत: रस्त्याच्या कडेला पडून असणारा दगड कुणाच्या आकर्षणाचे केंद्र होत नाही. पण कलावंतांच्या हातून दगडाला स्वरूप मिळाले तर त्याचे स्वरूपच पालटते. दगडांच्या विविध आकारातून व्यक्तिचित्रशिल्प आकार घेतात तेव्हा पाषाणाचाही देव होतो. पाषाणालाही संवेदनेचा अर्थ देणाऱ्या भन्नाट कलाकृतींनी आज रसिकांना स्तिमित केले. मुंडले एज्युकेशन ट्रस्टद्वारा संचालित सिस्फाच्या छोट्या गॅलरीत लक्ष्मीनगर येथे सिस्फाचा मान्सून बोनान्झा सुरू आहे. या अंतर्गत दुसरे पाषाण चित्रशिल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यातील सर्व पाषाणचित्रे ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके यांनी साकारली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, उद्योजक प्रभाकरराव मुंडले, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, प्रमोदबाबू रामटेके, आ. मिलिंद माने, चंद्रकांत चन्ने यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण आयुष्य दगडासारखेच कणखरपणे जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची निवड या प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. सिस्फाचे अधिष्ठाता चंद्रकांत चन्ने आणि प्रमोदबाबू रामटेके यांच्या संकल्पनेतून या अनोख्या कलाकृती तयार झाल्या. एकूण २० व्यक्तिमत्त्वांची निवड केल्यावर संबंधित आकारातील दगडांचा शोध हे एक आव्हान होते. पण नागपूरच्या जवळ असणाऱ्या धरणातील विविध आकारांचे पाषाण परिश्रमपूर्वक प्रमोदबाबूंनी शोधले. त्या त्या व्यक्तींचे स्वभाव, कार्य आणि त्यांच्या प्रतल आणि खोलीचा विचार करून या दगडांची निवड करण्यात आली. यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, राम शेवाळकर, प्रभाकरराव मुंडले, कवी ग्रेस, ताई सुकळीकर, ज्योत्स्ना दर्डा, महेश एलकुंचवार, अटलबहादूर सिंग, सीमा साखरे, चंद्रकांत चन्ने, रा.सू. गवई, जोगेंद्र कवाडे, खा. नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मारुती चितमपल्ली, यशवंत मनोहर, नाना गोखले, प्रतिभाताई पाटील, गिरीश गांधी आणि सुरेश भट यांची चित्रे साकारण्यात आली आहेत.विशेषत: या व्यक्तिचित्रणासह त्यांच्या कार्याचेही प्रतिकात्मक रेखाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रभाकरराव मुंडले म्हणाले, सिस्फाचे हे प्रदर्शन प्रशंसनीय आहे. त्यांनी प्रमोदबाबूंना शुभेच्छा दिल्या. पीयूषकुमार यांनी हे अनोखे प्रदर्शन पाहून आनंद झाल्याचे मत व्यक्त केले. प्रमोदबाबू म्हणाले, व्यक्तिचित्रणाचा हा वेगळा पैलू हाताळताना एका वेगळ्याच संवेदनेची अनुभूती होत गेली. दगडांच्या विविध प्रतलांना हाताळताना कॅनव्हासची खोलीसुद्धा मी अनेकदा विसरलो. चंद्रकांत चन्ने म्हणाले, प्रमोदबाबूंच्या या कलाकृती केवळ कलाकृती नाहीत तर ती त्यांची ७० वर्षांची साधना आहे. संपूर्ण जगात असा प्रयोग प्रथमच होतो आहे. हे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी १७ जूनपर्यंत सायंकाळी ४ ते ८.३० पर्यंत खुले आहे.(प्रतिनिधी)प्रमोदबाबूंना विद्यापीठाने डी.लिट. द्यावीयेथे येण्यापूर्वी या अनोख्या शैलीची कल्पना नव्हती. जगातले सर्वच कलात्मक प्रयोग आणि आर्ट गॅलरी मी पाहिल्या. पण असा प्रयोग जगभरात मी कुठेही पाहिला नाही. पाषाणकलेतले हे संशोधनच आहे. चित्र आणि शिल्प यांचा अनोखा संगम हा आहे. प्रत्येक व्यक्तिचित्रांना प्रमोदबाबूंनी दिलेला न्याय वादातीत आहे. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना विद्यापीठाने डी. लिट. द्यायला हवी, असे आवाहन खा. विजय दर्डा यांनी केले. याप्रसंगी विजय दर्डा यांनी प्रत्येक चित्राचा भाव, त्याचा अर्थ आणि त्यातली कलात्मकता समजून घेत प्रमोदबाबूंना शुभेच्छा दिल्या. दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांचे चित्रशिल्प प्रमोदबाबूंनी नेमकेपणाने रेखाटल्याचे त्यांनी प्रामुख्याने नमूद केले.