शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कामठी तालुक्यात अवैध ‘सॅंड डम्प यार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:13 IST

कामठी : शासनाने नागपूर जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव केला नसताना कामठी तालुक्यातील कन्हान नदीवरील काही घाटांमधून रेतीचा अवैध उपसा ...

कामठी : शासनाने नागपूर जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव केला नसताना कामठी तालुक्यातील कन्हान नदीवरील काही घाटांमधून रेतीचा अवैध उपसा सुरूच आहे. ती रेती तालुक्यातील येरखेडा, रनाळा, गादा व आवंढी शिवारात साठवून ठेवत नंतर विक्रीसाठी पाठविली जाते. त्यामुळे या शिवारात अवैध ‘सॅंड डम्प यार्ड’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या रेतीतस्करीला स्थानिक नेत्यांसह खनिकर्म, महसूल व पाेलीस प्रशासनाचा वरदहस्त असल्याने शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

कामठी तालुक्यात कन्हान नदीवर बिना, वारेगाव, नेरी, उनगाव, चिकना व भामेवाडा हे सहा रेतीघाट आहेत. यातील एकाही घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. मात्र, या सर्व घाटांमधून रेतीचा उपसा अव्याहतपणे सुरू आहे. घाटांमधील रेती पाेकलॅण्ड मशीन किंवा जेसीबी मशीनच्या मदतीने काढली जात असून, ती ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरच्या मदतीने तालुक्यातील येरखेडा, रनाळा, गादा व आवंढी शिवारातील खाली जागेवर अथवा शेतात साठवून ठेवली जाते. त्यामुळे या भागातील काही शेतात माेठ्या प्रमाणात रेतीचे ढीग साठवून ठेवल्याचे दिसून येते.

या घाटांमधून रेतीचा उपसा करण्यात कामठी तालुक्यातील नेरी, गुमथळा तसेच माैदा तालुक्यातील काही रेतीतस्कर आघाडीवर आहेत. ही मंडळी राेज मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत रेतीचा अवैध उपसा करतात. त्यांचे स्थानिक राजकीय नेत्यांसाेबत खनिकर्म, महसूल व पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांशी ‘अर्थ’पूर्ण संबंध असल्याने त्यांच्यावर कुणीही ठाेस कारवाई करीत नाही. त्यामुळे शासनाला काेट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागत आहे.

---

काेट्यवधीच्या महसुलावर पाणी

तालुक्यातील कन्हान नदीवर असलेल्या सहा रेतीघाटाचे लिलाव केल्यास राज्य शासनाला वर्षाकाठी किमान सहा ते सात काेटी रुपयांचा महसूल मिळू शकताे. घाटांचे लिलाव करण्यात न असल्याने तसेच घाटांच्या सुरक्षेकडे खनिकर्म व महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने शासनाला या महसुलापासून मुकावे लागत आहे.

---

रस्त्यांची दैनावस्था

रेतीच्या ‘ओव्हरलाेड’ वाहतुकीमुळे रेतीघाट परिसर व संबंधित गावालगतच्या रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. स्थानिक नागरिकांनी या रेती वाहतुकीला विराेध केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रेतीतस्करांचे हस्तक दादागिरी करीत असल्याने त्यांना विराेध करण्यास कुणीही धजावत नाही.