शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

आठ हजार विद्यार्थी शिकणार कसे ?

By admin | Updated: June 15, 2015 02:51 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागपूर विभागातील आठ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे.

मंगेश व्यवहारे नागपूरएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नागपूर विभागातील आठ हजार आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. २६ जूनपासून शाळांना सुरुवात होणार आहे. मात्र अद्यापही या योजनेसाठी शाळा मंजूर झालेल्या नाही. शाळाच नसतील तर आदिवासी विद्यार्थी कुठे बसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करून, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा आदिवासी विभागाचा मानस आहे. १ ते ५ या वर्गात या मुलांना शहरातील नामांकित निवासी शाळेत प्रवेश देणार आहे. या मुलांचा राहण्याचा, खाण्याचा खर्च आदिवासी विभाग करणार आहे. नागपूर विभागात आठ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत. प्रत्येक प्रकल्पात एक हजार मुलांना प्रवेश मिळणार आहे. यासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, अशी अट आहे. पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास प्राधान्य आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा निर्णय अतिशय योग्य आहे. मात्र या योजनेत अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. शाळा सुरू होण्याच्या तोंडावर असताना, या योजनेसाठी अद्यापही शाळा मिळालेल्या नाही. प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याने प्रवेशासाठी हजारो फॉर्म छापले आहेत. मात्र ते आदिवासींपर्यंत पोहचलेले नाही. या योजनेत विद्यार्थीच उपलब्ध होत नसल्याने, आता विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. नागपूर प्रकल्पात एक हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आतापर्यंत केवळ १४५ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. अप्पर आयुक्तांना वेळ नाहीया जनउपयोगी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी अप्पर आयुक्त माधवी खोडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी तब्बल दोन तास ताटकळत ठेवूनही प्रतिक्रिया दिली नाही. याचाच अर्थ या योजनेसाठी त्या खरंच संवेदनशील आहेत का? हे दिसून येते.