हावडा मुंबई मेलमधील गांजा तस्करीचे हायप्रोफाईल कनेक्शन; भिवंडीतून पुन्हा एक आरोपी गजाआड

By नरेश डोंगरे | Updated: January 27, 2026 20:10 IST2026-01-27T20:09:32+5:302026-01-27T20:10:49+5:30

Nagpur : हावडा मुंबई मेलमधून मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या गांजाचे कल्याण-मुंबईत हायप्रोफाईल कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता रेल्वेच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

High-profile connection of marijuana smuggling in Howrah Mumbai Mail; Another accused arrested from Bhiwandi | हावडा मुंबई मेलमधील गांजा तस्करीचे हायप्रोफाईल कनेक्शन; भिवंडीतून पुन्हा एक आरोपी गजाआड

High-profile connection of marijuana smuggling in Howrah Mumbai Mail; Another accused arrested from Bhiwandi

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
हावडा मुंबई मेलमधून मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या गांजाचे कल्याण-मुंबईत हायप्रोफाईल कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता रेल्वेच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांचे एक पथक भिवंडीत पोहचले असून तेथून एका गांजा तस्कराला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हावडा मुंबई मेलच्या एसी कोचमधून आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बिहारमधील चंद्रेश्वर राधा पासवान (वय ४०, रा. लडुई, कुसुम्हरा) आणि विक्कीकुमार वीरेंद्र सिंह (वय १९, रा. रामपूर, बिहार) या दोन गांजा तस्करांना २२ जानेवारीला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ६० किलो गांजा जप्त केला होता. हे दोघे सध्या रेल्वे पोलिसांच्या कस्टडीत असून त्यांची चाैकशी केली जात आहे. प्राथमिक चाैकशीत हे दोघे गांजाची ही खेप कल्याण (मुंबई)ला घेऊन जात होते, अशी माहिती पुढे आली आहे. ओडिशातील गांजा तस्करांनी या दोघांना ही खेप पोहचविण्याची जबाबदारी सोपविली होती. तर, कल्याणमध्ये एक तस्कर ही खेप स्विकारणार होता, हे चाैकशीतून पुढे आल्यानंतर या प्रकरणाची चाैकशी रेल्वेचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे शाखे (एलसीबी)कडे सोपविली. त्यानुसार, एपीआय पंजाबराव डोळे यांच्या नेतृत्वात एक पथक दोन दिवसांपूर्वी कल्याणकडे रवाना झाले होते. या गांजा तस्करीशी संबंधित एक आरोपी भिवंडीत असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी भिवंडीत छापेमारी करून एका आरोपीला आज मंगळवारी ताब्यात घेतले. त्याला घेऊन पोलिसांचे हे पथक बुधवारी दुपारपर्यंत नागपुरात पोहचणार आहे.

कुणाकुणाशी कनेक्शन ?

कल्याणला जाऊ पाहणाऱ्या या गांजाची खेप नेमकी कुणाकडे पोहचणार होती, तसेच भिवंडीतून अटक करण्यात आलेला आरोपी कुणाकुणाशी संबंधित आहे, ही माहिती आरोपीला नागपुरात आणल्यानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंजाबराव डोळे यांच्या नेतृत्वात पोलिस कर्मचारी पंकज बांते, राहुल येवले, उमेश भुरले, अविन गजबे, विशाल शेंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title : हावड़ा-मुंबई मेल गांजा तस्करी: हाई-प्रोफाइल कनेक्शन, भिवंडी में एक और गिरफ्तारी

Web Summary : हावड़ा-मुंबई मेल में जब्त गांजे का कल्याण कनेक्शन है। भिवंडी में एक गिरफ्तारी हुई। रेलवे पुलिस मामले की जांच कर रही है। जांच का उद्देश्य इस तस्करी में शामिल नेटवर्क का खुलासा करना और सभी जुड़े व्यक्तियों की पहचान करना है।

Web Title : Howrah-Mumbai Mail Ganja Smuggling: High-Profile Connections, Another Arrest in Bhiwandi

Web Summary : Ganja seized on the Howrah-Mumbai Mail has Kalyan connections. An arrest occurred in Bhiwandi. The railway police are investigating the case. The investigation aims to reveal the network involved in this smuggling operation and identify all connected individuals.