नागपुरात ऊन- पावसाचा खेळ चालूच; १९ मेपर्यंत विदर्भात तीव्र उष्ण लाटेचा इशारा

By निशांत वानखेडे | Updated: May 13, 2026 19:37 IST2026-05-13T19:36:28+5:302026-05-13T19:37:16+5:30

Nagpur : हवामान विभागाने वर्तवलेल्या उष्ण लाटेच्या शक्यतेत नागपूरकरांना बुधवारी ‘सरप्राई’ दिलासा मिळाला. अंदाजानुसार उपराजधानीचे तापमान वाढून ४४ अंशाच्या पार गेले.

Heat and rain game continues in Nagpur; Severe heat wave warning in Vidarbha till May 19 | नागपुरात ऊन- पावसाचा खेळ चालूच; १९ मेपर्यंत विदर्भात तीव्र उष्ण लाटेचा इशारा

Heat and rain game continues in Nagpur; Severe heat wave warning in Vidarbha till May 19

नागपूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या उष्ण लाटेच्या शक्यतेत नागपूरकरांना बुधवारी ‘सरप्राई’ दिलासा मिळाला. अंदाजानुसार उपराजधानीचे तापमान वाढून ४४ अंशाच्या पार गेले. त्यामुळे दुपारपर्यंत तीव्र उन्हाचे चटके आणि भीषण उकाड्याचा सामना करावा लागला, पण दुपारनंतर वातावरण बदलले आणि सायंकाळी अनेक भागात वादळी पावसाची हजेरी लागली.

वेधशाळेने येत्या १९ मे पर्यंत विदर्भासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटेचा इशारा दिला आहे. सध्याच्या वाढलेल्या तापमानात आणखी २ ते ३ अंशाची भर पडेल, असा अंदाज आहे. त्यानुसार कायम सूर्य प्रकाेपाचा सामना करणाऱ्या अकाेला, अमरावती व वर्धा जिल्ह्यात पारा पुन्हा उच्चांकीकडे वाटचाल करीत आहे. यात नागपूरही मागे नाही. मंगळवारी ४३ अंशावर असलेले शहराचे तापमान बुधवारी १.२ अंशाने उसळून ४४.२ अंशावर पाेहचला. सकाळच्या सुमारास काहीसे ढगाळ वातावरण सूर्य डाेक्यावर चढताना निवळले व उन्हाचे चटके अधिक तीव्र झाले. त्यामुळे भीषण उकाड्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागला. मंगळवारी रात्रीचे तापमानही उसळून २८.४ अंशावर पाेहचले हाेते.

दुपारनंतर मात्र वातावरणाचा रंग बदलला. आकाश पुन्हा ढगांनी व्यापले व उन्हाचा तडाखा कमी झाला. सायंकाळ हाेता हाेता पावसाचे सावट पसरले. मात्र पावसाचा जाेर काही भागात दिसून आला. नंदनवनसह पूर्व नागपूर भागात वादळासह जाेरदार सरी बरसल्या, तर सीताबर्डी, सिव्हील लाईन्स भागात तुरळक थेंबाचा वर्षाव झाला. पावसाचे वितरण असमान असले तरी तीव्र उकाड्यापासून काहीसा दिलासा नक्कीच मिळाला.

मात्र हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पावसाळी वातावरणाचा दिलासा एक दिवसच मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भीषण उष्णतेचा सामना करावाच लागणार आहे. वेधशाळेने येत्या १९ मे पर्यंत उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कमाल तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याचा अंदाज आहे.

Web Title : नागपुर में धूप-बारिश, 19 मई तक विदर्भ में लू का अलर्ट।

Web Summary : नागपुर में भीषण गर्मी के बाद शाम को बारिश हुई। विदर्भ, मराठवाड़ा और मध्य महाराष्ट्र में 19 मई तक लू का अलर्ट जारी किया गया है, तापमान और बढ़ने की संभावना है। गर्मी से राहत अस्थायी हो सकती है।

Web Title : Nagpur sees sun-rain, heatwave warning till May 19 in Vidarbha.

Web Summary : Nagpur experienced scorching heat followed by evening showers. A heatwave warning is issued for Vidarbha, Marathwada, and central Maharashtra until May 19, with temperatures expected to rise further. Relief from the heat may be temporary.