शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 09:16 IST

पोलिसांनी काही अंतरावरून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर/ हिंगणा : शिकवणी वर्गातून मुला-मुलीला परत आणायला गेलेल्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऑटोतून खाली उतरल्यावर मागून आलेल्या भरधाव ट्रकने तिच्या डोळ्यासमोर सात वर्षीय मुलाला चिरडले अन् फरफटत घेऊन गेला. जखमी मुलाचा जागीच मृत्यू झाला अन् क्षणात संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

हिंगणा मार्गावर झालेल्या या घटनेनंतर तणावाचे वातावरण होते. आहान सूरज नायक (७, श्रमिकनगर, हरिगंगा, एमआयडीसी) असे मृतक मुलाचे नाव आहे. तुलसी सूरज नायक (२७) या त्यांची मुलगी स्नेहा (९) व आहान यांना रामदासपेठ येथे शिकवणी वर्गातून घेऊन येत होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास ऑटो हिंगणा नाका टी पॉइंट येथे हिंगण्याकडे जाणाऱ्या मार्गावर थांबला. तुलसी या ऑटोचालकाला पैसे देत होत्या व स्नेहा तसेच आहान खाली उतरले होते. त्याचवेळी नागपूरहून हिंगण्याच्या दिशेने एमएच ४० सीआर ५१०० हा ट्रक वेगाने आला. त्याने आहानला जोरात धडक दिली. आहान ट्रकच्या चाकाखाली आला व देशमुख ट्रेडिंग कंपनीच्या समोरून काही अंतरावर ट्रकने त्याला फरफटत नेले. त्यानंतर ट्रकचालक तेथून फरार झाला. हा प्रकार पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला.

घटनास्थळावरील लोकांनी आहानकडे धाव घेतली. तर तुलसी यांच्या पायाखालची जमीनच निसटली. लोकांनी आहानला लता मंगेशकर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी काही अंतरावरून ट्रकचालकाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात एमआयडीसी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांचा कुठलाही वचक नसल्याने या मार्गावर वेगाची मर्यादा न पाळता मनमर्जीने जड वाहनांची वाहतूक सुरू असते.

कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी

आहानचे वडील सूरज नायक (३२) हे ऑटोचालक आहेत. आपली मुले शिकली पाहिजेत हे नायक दाम्पत्याचे स्वप्न होते. आहान व स्नेहा हे दोघेही प्रिया विद्याविहार शाळेत शिकत होते. दोघेही रामदासपेठला शिकवणी वर्गासाठी जात होते. तुलसी या स्वत: ऑटोने त्यांची ने-आण करत होत्या. मुलगा व मुलगी शिकून मोठे व्हावे यासाठी पती-पत्नीचा आटापिटा सुरू होता. मात्र भरधाव ट्रकचालकाने त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली.

भरधाव वाहनांवर नियंत्रण नाहीच

हिंगणा मार्गावर भरधाव वाहने चालतात. त्या ठिकाणी वाहतूक पोलिस नावालादेखील नसतात. जर एखादेवेळी बंदोबस्ताला आलेच तर वसुलीवरच जास्त भर दिसून येतो. या मार्गावर गतिरोधक व्हावे अशी मागणी होत असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच दुर्लक्षामुळे चिमुकल्या आहानचा बळी गेला.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात