शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारची डोळेझाक - राहुल गांधी

By admin | Updated: April 30, 2015 16:52 IST

शेतक-यांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, मात्र सरकार त्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
तोंगलाबाद, दि. ३० -  शेतक-यांची स्थिती अतिशय चिंताजनक आहे, मात्र सरकार त्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. विदर्भाच्या दौ-यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात अमरावतीतील गुंजी ते रामगावपर्यंत १५ किमीची पदयात्रा करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यानंतर तोलंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. 'मी यापूर्वीही विदर्भात येऊन गेलो, मात्र आजच्या इतकी भयानक परिस्थिती मी पाहिली नव्हती' असे ते म्हणाले. 'कर्जाच्या ओझ्याने पिचलेले अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना काही मंत्री मात्र तीनच शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा  दावा करतात तर काही जण त्या शेतक-यांची भेकड म्हणून अवहलेना करतात' असे सांगत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार शेतकरी वा मजुरांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली.  
यावेळी त्यांनी शेतक-यांना धीर न सोडण्याचे आवाहन केले. या लढाईत काँग्रेस शेतक-यांच्या पाठीशी असून पक्षाकडून शेतक-यांना शक्य तितकी मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.