शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाल कपडा दाखवून थांबविली गोंडवाना एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 21:57 IST

रेल्वे रुळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे नटबोल्ट ढिले झाल्याची बाब एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आली. थोड्याच वेळात या रुळावरून गोंडवाना एक्स्प्रेस जाणार होती. त्या नागरिकाने लाल रंगाची ओढणी घेऊन गोंडवाना एक्स्प्रेस थांबविल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली.

ठळक मुद्देज्येष्ठ नागरिकाची समयसूचकता : संभाव्य अपघात टाळण्यास केली मदत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे रुळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे नटबोल्ट ढिले झाल्याची बाब एका ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आली. थोड्याच वेळात या रुळावरून गोंडवाना एक्स्प्रेस जाणार होती. त्या नागरिकाने लाल रंगाची ओढणी घेऊन गोंडवाना एक्स्प्रेस थांबविल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत झाली. ही घटना शनिवारी दुपारी १.२५ वाजता इटारसी पुल ते मार्टिननगर दरम्यान घडली.नारा येथील रहिवासी पंकज शिवराम कानफाडे (६३) असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांनी जबाबदार आणि जागरुक नागरिक असल्याचा परिचय दिला. कानफाडे हे एका ले- आऊटच्या कार्यालयात काम करतात. कार्यालयात असताना दुपारच्या सुमारास ते लघुशंकेला गेले असता त्यांना गोधनी-नागपूर दरम्यान किलोमीटर क्रमांक १०३९/७-५ येथे दोन रूळाला जोडणाऱ्या लोखंडी पट्टीचे बोल्ट ढिले झाल्याचे दिसले. या रुळावरून रेल्वेगाड्या गेल्यास अपघात होऊ शकतो ही बाब त्यांनी हेरली. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी लगेच सायकलने जरीपटका पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जरीपटका पोलीस कानफाडे यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. दरम्यान कानफाडे यांनी कार्यालयाशेजारीच राहणाऱ्या कोमल नावाच्या युवतीला तिची लाल रंगाची ओढणी मागितली आणि कार्यालयातील एका लाकडाला बांधली. गोंडवाना एक्स्प्रेस येत असताना त्यांनी लाल झेंडी दाखविल्यामुळे गोंडवाना एक्स्प्रेस थांबली. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक एस. पी. सिंग, सुरेश दुलग, बी. एम. मदनकर पोहोचले. चाबी मॅनने नवीन नटबोल्ट लावल्यानंतर गोंडवाना एक्स्प्रेस पुढील प्रवासाला रवाना झाली. कानफाडे यांनी समयसूचकता दाखविली नसती तर या मार्गावर अपघात घडला असता, हे निश्चित.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात