शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सुवर्ण लक्ष्मी योजना आणि सुवर्ण सार्थक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची एका सराफाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सुवर्ण लक्ष्मी योजना आणि सुवर्ण सार्थक योजनेत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची एका सराफाने रोकड हडपली. जितेंद्र तिवारी असे आरोपी सराफाचे नाव असून त्याचे इतवारीच्या सराफा बाजारात सुवर्णमोती जेम्स ॲन्ड ज्वेलर्स नावाने दुकान होते. वर्षभरापूर्वी दुकानाला टाळे लावून तो गायब झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.

२ जानेवारी २०१९ ला तिवारीने सुवर्ण लक्ष्मी योजना आणि सुवर्ण सार्थक योजना सुरू करून गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. वर्षभर या योजनांत अनेकांनी हजारोंची रक्कम गुंतवली. १२ जानेवारी २०२० ला योजनेचा अवधी पूर्ण झाल्यामुळे गुंतवणूकदार दासाराम लखराम पंचभूते (वय ७२), स्नेहल कापसे त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याने रक्कम परत करण्यासाठी वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळले. मार्च २०२० मध्ये त्याने दुकानाला टाळे लावले अन् बेपत्ता झाला. फोनवर तो गुंतवणूकदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची बनवाबनवी उघड झाल्याने पंचभूते तसेच कापसे यांनी तहसील ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपी सराफा जितेंद्र तिवारी याचा पोलीस शोध घेत आहेत.

----

अनेकांना गंडा, तक्रारदार वाढणार

तिवारीने अशा प्रकारे अनेकांना गंडा घातला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तक्रारदार पोलिसांकडे पोहचतील, असा अंदाज आहे.

---