शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाची बोगस जाहिरात!

By admin | Updated: July 24, 2015 02:36 IST

महाराष्ट्र वन विभागाच्या नावाने बोगस संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करू न त्यावर पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे.

वेबसाईटही तयार : वन अधिकाऱ्यांची झोप उडाली नागपूर : महाराष्ट्र वन विभागाच्या नावाने बोगस संकेतस्थळ (वेबसाईट) तयार करू न त्यावर पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे, या बोगस वेबसाईटवर ‘महाराष्ट्र वन विभाग’असा ठळक अक्षरात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ती जाहिरात बघितल्यानंतर कुणालाही बोगस असल्याशी शंका येत नाही. या वेबसाईटने वन अधिकाऱ्यांची झोप उडविली आहे. या बोगस संकेतस्थळावर पद भरती प्रक्रि येविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही सरळ पद भरती असल्याचा उल्लेख करू न याद्वारे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) मुंबई कार्यालयासाठी गट-क संवर्गातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय यासाठी २२ जुलै २०१५ रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत आॅनलाईन कागदपत्र व बँक आॅफ इंडियाच्या खाते क्र. ०७५३१०११०००७४१८ यावर ५०० रुपये जमा करावे, अशा सूचना दिल्या आहेत. सोबतच संबंधित व्यक्तीने ७३८७३९७५३२ असा मोबाईल क्रमांकही दिला आहे. या बोगस जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील अनेक बेरोजगार तरुणांना फसविण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वन विभागाने या बोगस संकेत स्थळावरील पद भरतीशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करू न, त्याची वन विभाग चौकशी करीत असल्याचे सांगितले आहे; सोबतच कुणीही या बोगस जाहिरातीला बळी पडू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. यासंबंधी वन विभागाचे प्रभारी माहिती व प्रसिद्धी अधिकारी नाईक यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी वन विभागातील एका वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी या बोगस वेबसाईटचा भंडाफोड केला असल्याचे सांगितले. शिवाय ‘लोकमत’ प्रतिनिधीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता पुढील व्यक्तीने पद भरतीसाठी कागदपत्र जमा करण्याची मुदत संपली असल्याचे सांगून फोन कट केला.(प्रतिनिधी)