शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांनी सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र

By admin | Updated: April 19, 2017 02:37 IST

जमिनीच्या युजरमध्ये बदल करण्याविषयीच्या प्रकरणात खोटी माहिती दिल्यामुळे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर

हायकोर्टाने फटकारले : जमिनीच्या युजरमध्ये बदल करण्याचे प्रकरण नागपूर : जमिनीच्या युजरमध्ये बदल करण्याविषयीच्या प्रकरणात खोटी माहिती दिल्यामुळे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी कडक शब्दांत फटकारून कायद्यानुसार कारवाई करण्याची तंबी दिली. दरम्यान, मनपाच्या वकिलाने योग्य स्पष्टीकरण सादर करण्यासाठी वेळ मागितल्यामुळे प्रकरणावर २१ एप्रिल रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शहर विकास आराखड्यात दुरुस्ती करण्यात आल्यानंतर गोवर्धन व वेदभूमी इन्फ्रास्ट्रक्चर्स यांनी औद्योगिक प्लॉटस्चा रहिवासी व व्यावसायिक उपयोग करण्यासाठी युजरमध्ये बदल करण्याकरिता मनपाकडे अर्ज सादर केले होते. मनपा आयुक्तांनी दोन्ही अर्ज खारीज केले. या निर्णयाविरुद्ध कंपन्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनपाने १७ जानेवारी २००९ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार औद्योगिक प्लॉटस्च्या युजरमध्ये बदल करता येतो. अन्य समान प्रकरणात युजरमध्ये बदल करण्याची परवानगी देण्यात आली आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणात हर्डीकर यांनी ७ मार्च २०१७ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करून कोणालाही औद्योगिक प्लॉटस्च्या युजरमध्ये बदल करण्याची परवानगी दिली नसल्याची माहिती न्यायालयाला दिली. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी औद्योगिक प्लॉटस्च्या युजरमध्ये बदल करण्याची परवानगी मिळालेली काही प्रकरणे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी न्यायालयाने संतप्त होऊन मनपा आयुक्तांना खडेबोल सुनावले. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. रोहित मालविया यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)