शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

चळवळीचे तत्त्वज्ञान गीतातून मांडले

By admin | Updated: August 18, 2014 00:37 IST

आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नसतो, मात्र वामनदादांनी आंबेडकरी चळवळीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या अशिक्षित माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीत

नागपूर : आज कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला कुणी तयार नसतो, मात्र वामनदादांनी आंबेडकरी चळवळीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या अशिक्षित माणसाला बाबासाहेबांच्या चळवळीत जगलेली माणसेच नाहीत, तर येणारी प्रत्येक पिढी वामनदादा याच नावाने संबोधत राहील. एक कुटुंबप्रमुख म्हणून महाकवी वामनदादा कर्डकांनी १९४३ ते २००४ या कालखंडात चळवळीवर ५ हजाराहून अधिक गीते लिहून चळवळीचे तत्त्वज्ञान समाजापुढे मांडले. कर्डक म्हणजे आंबेडकरी चळवळीचा तपशिलवार लेखाजोखाच होते, असे मत वामनदादांच्या लोक गीतांचे गाढे अभ्यासक व चिंतक प्रा. डॉ. सागर जाधव यांनी व्यक्त केले. निळाई सामाजिक, सांस्कृतिक परिवार यांच्यातर्फे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त ‘आंबेडकरी चळवळीत वामनदादांचे योगदान’ या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला मुख्य वक्ते म्हणून प्रा. डॉ. सागर जाधव उपस्थित होते. यावेळी मंचावर अमर रामटेके, इंजि. राहुल दहीकर, शामराव हाडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सागर जाधव यांनी महाकवी वामनदादा यांच्या काव्यांवर पीएच.डी. केली आहे. वामनदादा अशिक्षित माणूस. मात्र बाबासाहेबांच्या कार्याचे प्रचंड आकर्षण. बाबासाहेबांनी सांगितले, आपले सामर्थ्य आणि कर्तृत्व सिद्ध करणारी लेखणी आणि वाणी ही दोन महत्त्वाची शस्त्र आहेत आणि वामनदादांनी तेच लक्षात ठेवले. बाबासाहेबांच्या चळवळीत ते जगले. त्यांनी आंदोलन भोगले आणि यातून त्यांच्या लेखणीला शब्द फुटले. त्यांनी चळवळीच्या विविध अंगावर रचलेली गीत, काव्य आणि गझलेतून चळवळीला अतिशय व्यापक केले. १९५१ च्या नायगावच्या सभेत बाबासाहेबांकडून त्याला शाब्बासकी मिळाली. ही कौतुकाची थाप त्यांना स्फूर्ती देऊन गेली. यातून त्यांनी ५००० गीते रचली. त्यामुळेच आंबेडकरी चळवळीचा माणूस बाबासाहेबांनंतर वामनदादांना अभिवादन करतो, असे ते म्हणाले. याप्रसंगी काव्यधारेचेही आयोजन करण्यात आले होते. यात अमर रामटेके, जगदीश राऊत, दिगांबर चनकापुरे, प्रकाश कांबळे, सुरेश वंजारी आदींनी काव्यवाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रवीण कांबळे यांनी केले. (प्रतिनिधी)