कोरोना : तुरुंगातील कैद्यांद्वारे मास्कची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:47 AM2020-03-19T00:47:51+5:302020-03-19T00:48:47+5:30

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंदिवानांद्वारे ‘मास्क’निर्मिती करण्यात येत आहे.

Corona: The creation of masks by prison inmates | कोरोना : तुरुंगातील कैद्यांद्वारे मास्कची निर्मिती

कोरोना : तुरुंगातील कैद्यांद्वारे मास्कची निर्मिती

Next
ठळक मुद्देगृहमंत्र्यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने राज्यात ‘मास्क’ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात ‘मास्क’चा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंदिवानांद्वारे ‘मास्क’निर्मिती करण्यात येत आहे.
अचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात ‘मास्क’चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कारागृह बंदिवानांद्वारे मास्कनिर्मिती केल्यास पुरवठ्यााचे प्रमाण वाढविता येणे शक्य आहे. याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘मास्क’निर्मितीची कल्पना मांडली. त्याला तुरुंग प्रशासनानेही उत्तम प्रतिसाद देत तात्काळ ‘मास्क’निर्मितीला प्रारंभ केला. हे मास्क बनवून ते स्वत:ही तसेच तुरुंग प्रशासनही वापरत आहे. तसेच बाजारातील तुटवडा पाहता विक्रीसाठी पुरवठादारांना देण्यात येत आहेत. बंदिवानांनाही त्याचा मोबदला त्यांच्या नावावर जमा केला जातो.

Web Title: Corona: The creation of masks by prison inmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.