शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोत धांगडधिंगा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:08 IST

नागपूर : बुधवारी मेट्रोच्या कोचमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली धांगडधिंगा करून पैशांची उधळण करण्यात आली. एवढेच नव्हे तर जुगारही खेळण्यात आला. ...

नागपूर : बुधवारी मेट्रोच्या कोचमध्ये वाढदिवसाच्या नावाखाली धांगडधिंगा करून पैशांची उधळण करण्यात आली. एवढेच नव्हे तर जुगारही खेळण्यात आला. या घटनेची महामेट्रोने गंभीर दखल घेतली आहे. मेट्रोच्या कोचमध्ये अशोभनिय वर्तन करणाऱ्यांविरुद्ध महामेट्रोने शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

महामेट्रोने वाढदिवस, प्री वेडींग शूट, लग्नाचा वाढदिवस, हळदीकुंकु यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सेलिब्रेशन ऑन व्हिल्स ही योजना सुरु केली. त्यानुसार बुधवारी राहुल शिरभाते या व्यक्तीच्या वाढदिवसासाठी मेट्रो रेल्वेचे कोच बुक करण्यात आले. वाढदिवसाच्या नावाखाली संबंधित व्यक्तींनी सीताबर्डी ते लोकमान्यनगर प्रवासात तृतीयपंथींना सोबत नेऊन धांगडधिंगा केला. तृतीयपंथींवर पैसे उधळले. एवढेच नव्हे तर मेट्रोच्या कोचमध्ये जुगारही खेळण्यात आला. याबाबतच्या हे कृत्य महा मेट्रोला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या उपक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याचे महामेट्रोने तक्रारीत म्हटले आहे. हे कृत्य जाणीवपूर्वक घडवून आणण्यात आल्यामुळे मेट्रोला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राहुल शिरभाते, राहुल कोल्हे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. महामेट्रो अ‍ॅक्ट २००२च्या कलम ५९ आणि ६४, तसेच भादंविच्या कलम ३४, १४९, १८८, २६८ आणि जुगार कायद्याच्या कलम १३ नुसार कारवाई करण्याची मागणी महामेट्रोने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. सोबतच मेट्रोच्या कोचमध्ये करण्यात आलेला धांगडधिंगा आणि जुगार खेळल्याचे चित्रीकरणही सीताबर्डी पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. महामेट्रोच्या तक्रारीनंतर पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

..........