शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे ग्राहक मंदी!

By admin | Updated: November 15, 2016 02:22 IST

एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या

नागपूर : एखाद्या संपाचा फटका बसावा, तसा फटका सध्या शहरातील सर्व व्यापारपेठांना बसतो आहे. एरवी ज्या ओळीत पाय ठेवायला जागा नसायची, त्या ओळीत गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट जाणवतो आहे. इतवारी परिसरातील किराणा ओळीतही हीच अवस्था आहे. नोटाबंदीमुळे किराणा व्यवसायावर मंदी येईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी केली नव्हती. परंतु नोटाबंदीमुळे किराणा ओळीत सलग सहा दिवसांपासून ग्राहकी नसल्याचा अनुभव येथील व्यापाऱ्यांना अनेक वर्षानंतर आला आहे. केंद्र सरकारने ९ नोव्हेंबरपासून देशभरात ५०० आणि १००० रुपयांची नोट चलनातून बंद केली. त्याचा परिणाम थेट व्यापारावर झाला. किराणासारखे व्यवसाय, जे दैनंदिन गरजेचे असतात. लग्नकार्याच्या सिझनमध्ये जिथे सातत्याने लगबग असते, अशा इतवारी परिसरातील किराणा ओळीत नोटाबंदीमुळे ग्राहकच फिरकत नसल्याचे चित्र आहे. सरकारने ११ नोव्हेंबरपासून बँकेतून पैशाची देवाण-घेवाण सुरू केली. मात्र मिळणारा पैसाही तोकडाच असल्याने, लोकांनी त्यात आपल्या गरजा पूर्ण केल्या. किराणा व्यवसाय साधारणत: महिन्याच्या ५ ते १५ या तारखांमध्ये तेजीत असतो. ग्राहकांचे वेतन या काळात होत असल्याने, इतवारी किराणा ओळीत लोकांची गर्दी असते. सध्या तर लग्नाचा सिझन आहे. या काळात तर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना वेळ नसतो. परंतु गेल्या ९ तारखेपासून सर्व व्यापारी सुस्त बसले आहेत. पहिल्या दिवशी ग्राहक आलेत. मात्र सामान कमी आणि चिल्लर अधिक घेण्यासाठी. त्यात व्यापाऱ्यांजवळील बहुतांश चिल्लर संपून गेली. बँका सुद्धा बंद होत्या. व्यापाराला अपेक्षित पैसा बँकेतून मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा घेणे बंद केले. तेव्हापासून किराणा ओळीतून ग्राहकांनीही पाय काढला. सलग सहा दिवसांपासून व्यापारी दुकान उघडून बसले आहे. काही व्यवहार चेकद्वारे सुरू आहे. किराणा व्यवसाय रोखीचा असल्याने किमान ८० टक्के परिणाम व्यवसायावर झाल्याचे व्यापारी सांगतात. (प्रतिनिधी) सोमवारी अपेक्षा होती सरकारच्या या निर्णयाचा असा परिणाम होईल, अशी अपेक्षा नव्हती. सलग सहा दिवसांपासून बाजारपेठेत असलेला शुकशुकाट पहिल्यांदाच अनुभवत आहे. सोमवारपासून बाजारपेठ सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु आजही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. मनोहर गोखले, किराणा व्यवसायिक व्यवसायाला ७० ते ८० फटका नोव्हेंबरच्या काळात आम्हाला श्वास घ्यायला वेळ नसते. लग्नाचा सिझन असल्याने, किराणा ओळीत पाय ठेवायला जागा नसते. परंतु नोटाबंदीमुळे ग्राहकी कमी झाली आहे. या आठवडाभरात किमान ७० ते ८० टक्के व्यवसायाला फटका बसला आहे. भरत वाधवानी, किराणा व्यापारी