शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

शहर पोलिसांचा ‘आवाज’ बंद

By admin | Updated: February 15, 2016 02:58 IST

शहर पोलीस दलाचा ‘आवाज’ म्हणून ओळख असलेले पोलीस माहिती केंद्र गेल्या २४ तासांपासून बंद पडल्यासारखे आहे.

दूरध्वनी सेवा कोलमडली : सुधारणा कधी होणार ?नागपूर : शहर पोलीस दलाचा ‘आवाज’ म्हणून ओळख असलेले पोलीस माहिती केंद्र गेल्या २४ तासांपासून बंद पडल्यासारखे आहे. दूरध्वनी सेवा कोलमडल्याने माहिती केंद्रातील पोलिसांची अक्षरश: त्रेधातिरपट होत आहे. हायटेक पुलिसिंगकडे वाटचाल करणाऱ्या नागपूर पोलिसांचा आवाज म्हणून माहिती केंद्राचा उल्लेख होतो. शहरातील सर्व पोलीस ठाणी, विविध विभाग आणि अधिकारी तसेच पत्रकारांशी माहिती केंद्र सातत्याने संपर्कात असते. कुठे काय घडले, ते ऐकण्या-सांगण्याचे अधिकृत स्थान म्हणूनही माहिती केंद्राचा उल्लेख होतो. मात्र, येथील दूरध्वनी सेवा शनिवारपासून विस्कळीत झाली आहे. वारंवार तक्रारी केल्यानंतर शनिवारी रात्री ती सुरळीत झाली, मात्र काही वेळेसाठीच! नंतर पुन्हा ती नादुरुस्त झाली. त्याला २४ तासांपेक्षा जास्त अवधी झाला तरी दूरध्वनी यंत्रणा दुरुस्त झाली नसल्याने शहरात नेमके काय घडले, त्याची अधिकृत माहिती मिळवण्याचे हक्काचे केंद्रच अबोल झाले आहे. येथील कर्मचारी आपल्या भ्रमणध्वनीवरून अधिकारी, पत्रकार यांच्याशी संपर्क साधून विस्कळीत यंत्रणेची दरी भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकावेळी एकच व्यक्ती भ्रमणध्वनीवर संपर्क करू शकतो, त्यात अधिकृतपणे विशिष्ट माहिती मिळवून द्यायची म्हटले की विविध ठिकाणी संपर्क करावा लागतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपट उडत आहे. (प्रतिनिधी)