शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या चौकीदारास झाली जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:57 IST

सत्र न्यायालयाचा निर्णय : बुटीबोरीतील शाळेच्या वसतिगृहात संतापजनक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे उराशी बाळगणाऱ्या स्वप्न अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम चौकीदाराला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली व एकूण १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जे. ए. शेख यांनी हा निर्णय दिला. ही संतापजनक घटना बुटीबोरी येथील आहे.

होमदेव उत्तम पडोळे (३५) असे आरोपीचे नाव असून तो ब्राह्मणी, ता. पवनी, जि. भंडारा येथील मूळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो बुटीबोरी येथील एका इंग्लिश मीडियम शाळेच्या वसतिगृहात चौकीदार म्हणून काम करीत होता. पीडित मुली गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी आदिवासी विभागाच्या शैक्षणिक योजनेंतर्गत या शाळेत प्रवेश घेतला होता. 

तसेच, त्या शाळेच्याच वसतिगृहात राहत होत्या. त्यांचा संपूर्ण खर्च सरकार उचलत होते. सरकारला त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे होते. परंतु, नराधम होमदेवची या विद्यार्थिनींवर वाईट नजर होती. तो कोणत्या ना कोणत्या कारणावरून विद्यार्थिनींना रागवायचा व मारहाण करायचा. त्यांना कोंबडा बनायला लावायचा. दरम्यान, त्याने सात मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. न्यायालयात सरकारच्या वतीने अॅड. प्रशांत साखरे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध ठोस पुराव्यांच्या आधारावर होमदेवला दोषी सिद्ध केले. 

अल्पवयीन मुलामुळे कुकृत्य उघडकीस

  • होमदेव वसतिगृहातील एका आदिवासी अल्पवयीन मुलावरही अनैसर्गिक अत्याचार करीत होता. एक दिवस तो मुलगा घरी गेला व त्याने शाळेमध्ये परत जाण्यास नकार दिला. पालकांनी सखोल विचारपूस केली असता त्याने होमदेवच्या सैतानी कृत्याची माहिती दिली.
  • त्यानंतर होमदेवविरुद्ध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. त्या प्रकरणात होमदेवला गेल्य जानेवारीमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे.
  • पीडित मुलाच्या तक्रारीमुळे आदिवासी विभागाने सखोल चौकशी केली असता सात पीडित विद्यार्थिनींनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. परिणामी, होमदेवविरुद्ध १७ फेब्रुवारी २०१७ रोजी दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला होता. 

आठ वर्षे चालला खटलाहा खटला निकाली निघण्यासाठी आठ वर्षे तीन महिने नऊ दिवसांचा कालावधी लागला. पोलिसांनी २६ एप्रिल २०१७रोजी हा खटला दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने २० ऑक्टोबर २०२१ रोजी होमदेवविरुद्ध आरोप निश्चित केले तर, १५ फेब्रुवारी २०२२ पासून पुरावे नोंदविण्यास सुरुवात झाली होती. 

अशी आहे पूर्ण शिक्षालैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याकरिता जन्मठेप व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास.ठार मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याकरिता एक वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास.

टॅग्स :nagpurनागपूर