शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

ब्लॅकलिस्टेड कंपनीला सिमेंट रस्त्याचे कंत्राट

By admin | Updated: May 14, 2016 02:51 IST

सिमेंट रस्त्यांची कामे समाधानकारक न केल्याने मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या (ब्लॅक लिस्ट)आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड यांच्यावर नागपूर...

नागपूर महापालिकेची कृपा : मुंबई महापालिकेने टाकले काळ्या यादीतनागपूर : सिमेंट रस्त्यांची कामे समाधानकारक न केल्याने मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या (ब्लॅक लिस्ट)आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड यांच्यावर नागपूर महापालिकेची मात्र कृपादृष्टी आहे. यातूनच सिमेंट रस्त्यांच्या सात टप्प्यातील तब्बल चार टप्पे या कंपनीला देण्यात आले आहे. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट कंपनीला मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त व मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांना विचारणा केली असता या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडूनही या संदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या सूचना प्राप्त झालेल्या नाही. शहरातील रिंगरोडचे काम याच कंपनीकडे असल्याने या कंपनीकडून शहरातील सिमेंट रस्त्यांचे काम करून घेणार असल्याची माहिती देबडवार यांनी दिली. शहरात ३२४ कोटींचे १८ टप्प्यात सिमेंट रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. यातील ६ टप्प्यातील ८ कामाच्या निविदा यापूर्वीच काढण्यात आल्या आहेत. शुक्र वारी स्थायी समितीच्या बैठकीत या कंपनीला टप्पा ५ व ७ मधील कामे देण्यात आली.या कंपनीला ५२.८८ कोटींची कामे देण्यात आलेली आहेत. तर तीन टप्प्यातील कामे जे.पी. इंटरप्रायजेस, दिशा डायनामिक्स व आर.एम. दयारानी या कंत्राटदारांना देण्यात आलेली आहेत. मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटारांकडून नागपूर शहरातील कामे चांगली होतील की नाही, हे तर भविष्यातच कळणार आहे. (प्रतिनिधी)तक्रार प्राप्त झालेली नाहीआरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेडबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झालेली नाही. शहरालगतच्या रिंगरोडचे काम या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीने शर्थी व अटींची पूर्तता केली आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम देण्यात आले आहे परंतु ठोस माहिती प्राप्त झाल्यास फेरविचार केला जाईल.सतर्कता बाळगू आरपीएस इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लिमिटेड कंपनीने नियमानुसार निविदा दाखल के ली आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्याचे काम देण्यात आले आहे. रस्त्याचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी कामाच्या पहिल्या दिवसापासून सतर्कता बाळगू.-बंडू राऊत, अध्यक्ष स्थायी समिती