शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर सीबीआयचा छापा

By admin | Updated: May 19, 2015 01:45 IST

गैरप्रकारांच्या अनेक तक्रारींमुळे वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात सोमवारी सीबीआयने

नागपूर : गैरप्रकारांच्या अनेक तक्रारींमुळे वादग्रस्त ठरलेल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या कार्यालयात सोमवारी सीबीआयने छापा घातला. तब्बल सहा तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी येथे चौकशी केली. कार्यालयातील अनेक फाईल्स तसेच महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतानाच अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाणही नोंदवून घेतले.दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून कमालीचा वादग्रस्त बनला होता. येथे काही अप्रतिम कलाकृती (पेंटिंग) होत्या. विदेशात त्या विकल्या तर चांगला फायदा होऊ शकतो, म्हणून यापूर्वीचे संचालक रवींद्र सिंघल यांनी तसा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. मात्र, लालफितशाहीमुळे त्याला मंजुरी मिळाली नाही. दरम्यान, सिंघल यांची बदली झाली. नवे संचालक म्हणून पीयूषकुमार यांनी पदभार सांभाळला. त्यानंतर हे पेंटिंग्स रहस्यमयरीत्या गायब झाल्याची चर्चा होती. तशा तक्रारीही वरिष्ठ पातळीवर झाल्या होत्या. त्यासोबतच विविध कार्यक्रम, कार्यालयीन खर्च आणि कलावंतांचे मानधन यासंबंधाने ‘उदार आर्थिक धोरण’ राबविले जात असल्याच्या तक्रारी झाल्या. वरिष्ठ पातळीवरून त्याची शहानिशा करण्यात आली. मात्र, समाधानकारक माहिती पुढे आली नाही. त्यामुळे सीबीआयकडे तक्रार करण्यात आली. सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या तक्रारीची आपल्या चमूकडून सूक्ष्म चौकशी करवून घेतली. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे सोमवारी दुपारी सीबीआयचे पथक दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात धडकले. अधिकाऱ्यांचे कार्यालय, कक्ष, तसेच कर्मचाऱ्यांच्या समोर त्यांनी विविध कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. त्यासोबतच काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. अनेकांचे बयाण नोंदविण्यात आले. तब्बल ६ ते ७ वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती. या दरम्यान, सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांचे मोबाईल स्वीच्ड आॅफ असल्यामुळे चौकशीत नेमके काय हाती लागले ते स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)प्रशासनात खळबळ४दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रावर सीबीआयने छापा घातल्याच्या वृत्तामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ निर्माण झाली. या केंद्राकडे अनेकांनी धाव घेत काय झाले ते जाणून घेण्याचे प्रयत्न केले. लोकमत प्रतिनिधीने दमसां केंद्राचे संचालक पीयूषकुमार यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी आता याबाबत काही बोलणार नाही, असे सांगून झालेल्या प्रकाराबाबत माहिती देण्याचे टाळले.