शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डचे कामकाज ठप्प: दहावी-बारावीच्या निकालावर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 18:20 IST

प्रशासनाविराेधात कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. हे आंदाेलन राज्यव्यापी असल्याने बाेर्डाचे कामकाज दिवसभर ठप्प राहिले. या आंदाेलनामुळे दहावी आणि बारावीच्या निकालावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. आंदाेलनावर लवकर तोडगा न निघाल्यास बोर्डाच्या परीक्षांच्या निकालात विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील इतर विभागासह नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन केले. राज्यभरातील ९ मंडळांमधील सुमारे ३५० कर्मचारी यात सहभागी आहेत. नागपूर मंडळातील सुमारे ५० कर्मचारीही या आंदाेलनात सहभागी झाले आहेत. शिक्षण मंडळाने पदोन्नती व बदली धोरणात बदल करून सेवा कालावधी २ वर्षांवरून ४ ते ६ वर्षांपर्यंत वाढवला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बोर्ड कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे, की हा निर्णय एकतर्फी घेण्यात आला असून राज्य शिक्षण कर्मचारी संघटनेला विश्वासात घेतले गेले नाही. यापूर्वी संघटनेने राज्यातील सर्व ९ विभागांमध्ये प्रतीकात्मक आंदोलन केले होते, मात्र प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. परिणामी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. विभागीय मंडळातील कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहिले, परंतु त्यांनी कामकाज केले नाही.

दिवसभर बैठकींचा धडाकासध्या दहावी व बारावीच्या निकालाची तयारी सुरू असून बहुतेक काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र क्रीडा, कला व सांस्कृतिक गुण नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे निकालात विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिवसभर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या. शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनी सर्व मंडळांचे अध्यक्ष व सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अध्यक्ष व सचिवांनीही कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचे सांगितले असून, पुढे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

निकालासाेबत पुरक परीक्षेवरही प्रभावबोर्डाच्या निकालांसोबतच पूरक परीक्षेची तयारीही सुरू होते. त्यामुळे या आंदोलनाचा परिणाम संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Board operations halt: Uncertainty looms over 10th, 12th results.

Web Summary : Maharashtra board employees' strike disrupts operations, casting doubt on timely results for 10th and 12th grades. Promotion policy changes triggered the action, potentially delaying supplementary exams too. Officials are holding meetings to resolve the situation.
टॅग्स :nagpurनागपूरssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा