शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

संघभूमीत स्मृती इराणी यांना दाखविले काळे झेंडे

By admin | Updated: February 12, 2016 03:30 IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच संघभूमीतील सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या स्मृती इराणी यांना ‘एनएसयूआय’

‘व्हीएनआयटी’त ‘एनएसयूआय’ कार्यकर्त्यांकडून निषेध : पोलीस सुरक्षेतील त्रुटी उघडनागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच संघभूमीतील सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या स्मृती इराणी यांना ‘एनएसयूआय’ (नॅशनल स्टुडन्ट्स युनिअन आॅफ इंडिया) व युथ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणासंदर्भात त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षाव्यवस्था असूनदेखील स्मृती इराणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी काही फुटांपर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांनी हा निषेध केला. यामुळे पोलीस सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे.‘व्हीएनआयटी’ येथे गुरुवारपासून संशोधनासाठी पुनरुत्थान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेच्या उद्घाटनासाठी स्मृती इराणी दुपारी ३ च्या सुमारास ‘व्हीएनआयटी’ येथे पोहोचल्या. यावेळी ‘व्हीएनआयटी’च्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर ‘एनएसयूआय’ कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरले व इराणी यांच्या वाहनांचा ताफा आत गेला. काही वेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील तेथे पोहोचले व दोघेही ४.४५ वाजता कार्यक्रम सभागृहाकडे निघाले. सभागृहासमोरील मोकळ्या मैदानातून पायी जात असताना उपस्थितांच्या गर्दीतून अचानक काही कार्यकर्ते त्यांच्या जवळ आले व इराणी यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारीदेखील गोंधळले. परंतु लगेच सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. झालेल्या प्रकाराबाबत स्मृती इराणी यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु निषेध करणाऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)...ते समाजकंटक असते तर !स्मृती इराणी यांच्या दौऱ्यादरम्यान असा प्रकार होऊ शकतो याची पोलीस प्रशासनाला माहिती होती. आयोजकांनादेखील याची कल्पना देण्यात आली होती. परंतु सुरक्षेबाबत हवी ती काळजी घेण्यात आली नाही. युथ काँग्रेस, ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी अहिंसात्मक पद्धतीने निषेध करण्याचे ठरविले होते व त्यानुसारच त्यांनी घोषणाबाजी केली. परंतु जर या कार्यकर्त्यांऐवजी कुणी समाजकंटक येथे पोहोचले असते तर स्मृती इराणी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता. इतकी मोठी चूक कशी काय झाली यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडे काहीही उत्तर नव्हते.