शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने ८७ नेत्यांची कुमक पाठवूनही केरळ हातून गेले

By कमलेश वानखेडे | Updated: May 5, 2026 15:35 IST

Nagpur : केरळ जिंकण्यासाठी भाजपने 'इलेक्शन मॅनेजमेंट'चा अनुभव असलेल्या राज्य व विदर्भातील ८७नेत्यांवर जबाबदारी सोपविली होती. हे नेते प्रचारात केरळमध्ये ठाणू मांडून होते.

कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळ जिंकण्यासाठी भाजपने 'इलेक्शन मॅनेजमेंट'चा अनुभव असलेल्या राज्य व विदर्भातील ८७नेत्यांवर जबाबदारी सोपविली होती. हे नेते प्रचारात केरळमध्ये ठाणू मांडून होते. मात्र, त्यानंतरही केरळमध्ये भाजपला यश आले नाही. केरळमध्ये फेल ठरलेले हे नेते बंगालचा विजय साजरा करीत कार्यकर्त्यांचे तोंड गोड करत धन्यता मानताना दिसले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केरळ जिंकण्यासाठी महाराष्ट्रातून कुमक पाठविली होती. राज्यभरातील अभ्यासू, बऱ्यापैकी इंग्रजी बोलता येत असणाऱ्या नेत्यांची केरळच्या प्रचारासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आ. डॉ. परिणय फुके, आ. प्रवीण दटके, माजी आ. अनिल सोले, गिरीश व्यास, आ. सुमित वानखेडे, आ. मिलिंद नरोटे, करण देवतळे, श्वेता महल्ले, रणजित पाटील, प्रताप अडसड यांच्यासह विदर्भातील तब्बल ८७नेत्यांचा यात समावेश होता.

निवडणुका कशा जिंकायच्या याचा अनुभव असलेल्या नेत्यांना यात प्राधान्य देण्यात आले होते. केरळच्या प्रचारात नेमके कोणते मुद्दे उचलायचे, महाराष्ट्रातील विकासाचा आलेख केरळमध्ये कसा मांडायचा आदी बाबींवर फोकस करण्याच्या सूचना संबंधितांना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. संबंधित नेत्यांनी चोखपणे ती जबाबदारी पार पाडली. मात्र, निकालात या प्रचाराचा फायदा झाल्याचे दिसले नाही. केरळमध्ये फेल ठरलेले भाजप नेते बंगालच्या निकालाचा गुलाल उधळत कार्यकर्त्यांना मिठाई भरवताना मात्र आघाडीवर होते.

केरळच्या यशात राऊत, केदार, ठाकरे यांचे योगदान

केरळच्या प्रचारात काँग्रेसकडून माजी मंत्री नितीन राऊत, सुनील केदार, आ. विकास ठाकरे, काँग्रेसचे अ. भा. सचिव प्रफुल्ल गुडधे आर्दीवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. या नेत्यांनी केरळमध्ये मुक्काम करीत प्रचाराची धुरा सांभाळली. महाराष्ट्र प्रभारी असलेले केरळचे नेते रमेश चेन्नीथला यांना प्रचारात साथ दिली. निरीक्षकाची भूमिका बजावत नाराज पदाधिकाऱ्यांना मनविण्यापासून ते मतदारसंघाचे नियोजन करण्यापर्यंतची जबाबदारी पार पाडली. केरळमध्ये काँग्रेसला यश मिळाल्याने या नेत्यांच्या परिश्रमाला पावती मिळाली आहे.

"पश्चिम बंगाल, आसाममध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. विकासाच्या राजकारणाचा हा पुरावा आहे. केरळमध्येही भाजपचे खाते उघडले गेले. ही एक सकारात्मक व ऐतिहासिक सुरुवात आहे. येत्या काळात केरळमध्येही भाजपची सत्ता येईल, यात दुमत नाही."- आ. डॉ. परिणय फुके, भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : Despite Sending 87 Leaders, BJP Lost Kerala Election

Web Summary : BJP deployed 87 leaders from Maharashtra to win Kerala, but failed. Congress leaders, including Nitin Raut, were credited with Congress's success. BJP leaders, however, celebrated Bengal's victory, seeing Kerala's initial BJP win as a positive start.
टॅग्स :Kerala Assembly Election 2026केरळ विधानसभा निवडणूक २०२६nagpurनागपूरBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेस