शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष शिस्तभंग करणाऱ्या मंत्री-आमदारांना भाजपाची तंबी

By admin | Updated: December 19, 2015 03:05 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहणाऱ्या एकूण २२ मंत्री व आमदारांना भाजपातर्फे तंबी देण्यात आली आहे.

संघ उद्बोधनात गैरहजेरी भोवली : २२ सदस्यांचा समावेशनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या उद्बोधन वर्गाला गैरहजर राहणाऱ्या एकूण २२ मंत्री व आमदारांना भाजपातर्फे तंबी देण्यात आली आहे. या वर्गाबाबत सूचना देऊनदेखील न येणे हे पक्षशिस्तीला धरून नसल्याचे, पक्षाने जारी केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षातील सदस्यांमध्ये शिस्त वाढीस लागली पाहिजे अशी अपेक्षा संघाकडून व्यक्त करण्यात आली होती. याची गंभीर दखल भाजपाने घेतल्याचे दिसून आले. विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने संघातर्फे उपराजधानीत आलेले भाजपचे आमदार व मंत्र्यांसाठी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित स्मृतिमंदिर येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रतिनिधींनी शिस्तीचे पालन करावे असे संघाचे अगोदरपासून मत आहे. त्यामुळेच भाजपातर्फे या कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती रहावी यासाठी पक्षाचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी सर्व आमदारांना याची कल्पना दिली होती. भाजपातर्फे वर्गस्थानावर उपस्थितांची हजेरीदेखील घेण्यात आली. प्रत्यक्ष वर्गाच्या वेळी १३९ आमदारांपैकी ११७ जणच उपस्थित असल्याची बाब समोर आली. अनुपस्थित असलेल्या २२ जणांमध्ये परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख व आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीश आत्राम तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांचादेखील समावेश होता. याची पक्षातर्फे गंभीर दखल घेण्यात आली व या सर्व आमदारांना तंबी देणारे पत्र पाठविण्यात आले. पक्षाने कळवूनदेखील अनुपस्थित राहणे हे पक्षशिस्तीच्या दृष्टीने योग्य नाही असे यात नमूद करण्यात आले आहे.नोटीस नव्हे तंबीभाजपाच्या २२ आमदारांना नोटीस दिली असल्याची चर्चा दिवसभर विधिमंडळात होती. यासंदर्भात संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांना विचारणा केली असता, पक्षशिस्त कायम राहावी व पुढे असे प्रकार होऊ नये यासाठी सर्वांना उद्देशून असे पत्र काढले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु नोटीस ही वैयक्तिकपणे देण्यात येते. भाजपातर्फे आमदारांना नोटीस देण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.गैरहजर राहिलेले सदस्य विजय देशमुख, अंबरीश आत्राम, आशीष देशमुख, कृष्णा खोपडे, देवयानी फरांदे, अनिल मोटे, लखन मलिक, समीर मेघे, लक्ष्मण पवार, सुभाष देशमुख, अमल महाडिक, मितेश भांगडिया, विनायक मेटे, सुधीर पारवे, भारती लव्हेकर, राहुल अहेर, प्रभुदास भिलावेकर, संतोष दानवे, योगेश टिळेकर, सुधीर गाडगीळ, रामनाथ मोते, महादेव जानकर.जानकर, मेटेंच्या समावेशाने आश्चर्यया पत्रामध्ये रासपचे महादेव जानकर व विनायक मेटे यांचे नावदेखील नमूद आहे. हे दोघेही भाजपाचे सदस्य नसून संघाशी यांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे त्यांचे नाव यात कसे आले याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. परंतु आम्ही दोघेही विधानपरिषदेत तांत्रिकदृष्ट्या भाजपाच्या ‘कोट्या’त असल्यामुळे आमचे नाव यात टाकण्यात आले आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.