शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यातही दमा वाढला! नागपूरच्या बांधकामांमुळे नागरिकांमध्ये श्वासविकार वाढत आहेत

By सुमेध वाघमार | Updated: May 5, 2025 17:38 IST

एप्रिलपर्यंत २,९८६ रुग्ण : सिमेंटच्या धुळीमुळे फुफ्फुसांवर संकट

सुमेध वाघमारे नागपूर : पावसाळ्यातील दमट हवा आणि हिवाळ्यातील धुक्यामुळे श्वसनविकार वाढतात, हे सर्वश्रुत आहे. उन्हाळ्यात मात्र या रुग्णांना काहीसा आराम मिळतो, असा समज होता. परंतु नागपूर शहरात सुरू असलेल्या सिमेंटची रस्ते, उड्डाण पूल, इमारतीचे बांधकाम, वाहनातील धूर शिवाय, वातावरणातील अचानक बदलांमुळे अस्थमा अर्थात दम्याच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी केलेल्या निरीक्षणात, ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

नागपूर शहराचा विकास वेगाने होत आहे. नवीन सिमेंटचे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामामुळे ज्या नागरिकांना आधीपासूनच श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्यात या विकारांची लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवत आहेत, असे मत क्रिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. अरबट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, उन्हाळा हा श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी 'हेल्दी सीझन' मानला जातो. मात्र, सध्याच्या प्रदूषणामुळे श्वसनाच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक रुग्ण सततचा खोकला, वाढलेला दमा आणि क्रॉनिक आॅब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांसारख्या समस्यांसाठी दवाखान्यात येत आहेत, ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

१६ टक्क्याने वाढले रुग्णडॉ. अरबट यांनी आकडेवारी देत सांगितले की, २०२३ च्या उन्हाळ्यात हॉस्पिटलमध्ये श्वसनविकाराचे सुमारे २४८७ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंतच ही संख्या १६.७१ टक्क्यांनी वाढून २,९८६ वर पोहोचली आहे.

सूक्ष्म धूळ फुफ्फुसाच्या आत सिमेंटच्या कामांमुळे हवेत उडणारी सूक्ष्म धूळ फुफ्फुसांच्या आतपर्यंत जाते. यामुळे सततचा खोकला, घसा खवखवणे, दमा, ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारांसारख्या समस्या वाढतात. सिमेंटच्या पृष्ठभागामुळे शहरात उष्णता अधिक काळ टिकून राहते, ज्यामुळे स्थानिक तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने वाढते आणि उष्णतेशी संबंधित आजार वाढतात. तसेच, सिमेंटमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने पुराचा धोकाही वाढतो.

एअर क्वालिटी इंडेक्स पोहचला १२८ पर्यंत बांधकामातून हवेत मिसळणारी सिलीका आणि फ्लाय अ‍ॅश लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी धोकादायक ठरत आहे. नागपूरचा सध्याचा एअर क्वालिटी इंडेक्स (पीएम१०) १२८ पर्यंत पोहोचला आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. या हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसाला जवळपास दोन सिगारेट ओढण्याइतके धोकादायक आहे.

प्रदूषण नियंत्रण आणि हिरवळ वाढवणे गरजेचेवाढत्या प्रदूषणाची दखल प्रशासनाने घेणे आता अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकामादरम्यान प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाºया ठेकेदारांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने कठोर धूळ आणि उत्सर्जनावर नियंत्रण मिळवणे, शहरात हिरवळीचे क्षेत्र वाढवणे आणि नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. वायू गुणवत्ता सुधारणे ही केवळ तांत्रिक बाब नसून, नागपूरच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसन विकार तज्ज्ञ

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर