शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, कुंभारे, बोढारे पाठोपाठ दुधराम सव्वालाखे भाजपात

By कमलेश वानखेडे | Updated: May 2, 2025 19:02 IST

राज्यात सत्ता जातात पडझड सुरू, आता कुणाचा नंबर ? : लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तब

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये पडझड सुर झाली आहे. महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून कार्यकाळ पूर्ण केलेले नेते आता आपल्या पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. याच कळीत आता दुधराम सव्वालाखे यांचेेही नाव जोडले गेले असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. सव्वालाखे यांचा भाजप प्रवेश हा माजी मंत्री सुनील केदार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेत सदस्य राहिलेले समीर उमप (शेकाप) यांनी सर्व प्रथम भाजप मध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी काँग्रेसचा हात सोडत केदार गटाला जोराचा धक्का दिला. हिंगणा मतदारसंघात उमेदवारीसाठी दावेदारी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उज्वला बोढारे यांनीही नुकतेच भाजपचा दुपट्टा गळ्यात घातला. महाविकास आघाडीला एकामागून एक धक्के बसत असताना आता दुधराम सव्वालाखे यांनीही काँग्रेसची साथ सोडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काळात आणखण्काही प्रवेश होण्याची शक्यता आहे.

सव्वालाखे यांनी जिल्हा परिषदेत नगरधन-भंडारबोडी सर्कलचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा परिषदेत गटनेते पदासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. पण ते जमले नाही. रामटेकच्या तिकीटासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. गेल्या काही दिवसांपासून सव्वालाखे काँग्रेसमध्ये असस्थ होते. त्यांच्या हालचालीतून ते भाजपमध्ये प्रवेश करीत असे संकेतही मिळत होते. शेवटी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी कामठी शहरात आयोजित भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश घेतला.

"आपल्या जिल्हा परिषद सर्कलमधील विकास कामे मागील अडीच वर्षांपासून थांबलेली होती. ती विकासकामे, रामटेक मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर व सर्व जनतेची कामे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात करण्याकरिता आपण भाजपात प्रवेश केला."- दुधराम सव्वालाखे, माजी जिल्हा-परिषद सदस्य

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाnagpurनागपूर