शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस समर्थकांच्या होर्डिंगवरून शाह गायब; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 12:17 IST

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लीन बोल्ड’ झाले.

नागपूर : राज्यात सत्ताबदलानंतर घडलेल्या राजकीय नाट्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. फडणवीस यांनी राज्यात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम दिल्लीतील भाजप नेत्यांनी केले असून, जाणूनबुजून त्यांचा ‘गेम’ केल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे, फडणवीस समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लावले असून, त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो मात्र गायब आहे. यावरून चर्चांना उधाण आले आहे.देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लीन बोल्ड’ झाले. माजी महापौर व फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांनी लावलेल्या होर्डिंग्जमधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो गायब आहे. याबाबत विचारणा केली असता पक्षाच्या प्रोटोकॉलनुसारच फोटो घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर प्रोटोकॉलनुसार फोटो घेतले आहेत.

शिंदेंच्या अभिनंदनाचे देखील ‘होर्डिंग्ज’एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांचे अभिनंदन करणारे ‘होर्डिंग’ किरण पांडव यांनी लावले आहे. त्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो असले तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा व फडणवीस यांचेदेखील फोटो आहेत.

नागपुरात भाजपचे संदीप जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरमधून  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो गायब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लागलेल्या बॅनरमध्ये मात्र शाह यांचा फोटो आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहEknath Shindeएकनाथ शिंदे