शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार प्रकरणात आंबेकर पोहोचला कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:07 IST

गँगस्टर संतोष आंबेकरला मुलाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी कारागृहात रवानगी केली. गुरुवारी सोनेगाव पोलीस खंडणी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात आंबेकरला अटक करणार आहे.

ठळक मुद्देमुंबई-बेंगळुरू पोलीस पोहोचले : आता सोनेगाव प्रकरणात होणार अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गँगस्टर संतोष आंबेकरला मुलाच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी कारागृहात रवानगी केली. गुरुवारी सोनेगाव पोलीस खंडणी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात आंबेकरला अटक करणार आहे. आंबेकरला पोलीस कोठडी आणि कारागृहात बुधवारी एक महिना पूर्ण झाला आहे.पीडित युवती मुलाची मैत्रीण असल्यामुळे आंबेकरची तिच्यावर नजर होती. पीडिता अल्पवयीन असतानाच आंबेकर तिचा त्रास देत होता. फोन करून आपत्तीजनक गोष्टी आणि हातवारे करायचा. या अल्पवयीनला एकदा तो हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर तिचे लैंगिक शोषण करू लागला. तो तिला मुंबई आणि बेंगळुरू येथे घेऊन गेला. तेथील हॉटेलमध्ये त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आंबेकरची दहशत असल्यामुळे पीडिताने तक्रार करण्याची हिंमत दाखविली नाही. या कारणामुळे आंबेकर आपल्याच घरी तिचे लैंगिक शोषण करू लागला.१२ आॅक्टोबरला खंडणी आणि फसवणुकीच्या प्रकरणात आंबेकरला अटक केल्यानंतर पीडित युवती हिंमत दाखवून तक्रार करण्यासाठी पुढे आली. या प्रकरणात ६ नोव्हेंबरला त्याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आंबेकरचे अनेक सोबती आणि भागीदार आताही शहरात सक्रिय आहेत. एक महिन्यानंतरही त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई केलेली नाही. हे लोक त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने आंबेकरला मदत करण्याचा मार्ग शोधत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यामुळे पीडित युवती चिंतेत आहे.गुन्हे शाखेच्या पोलिसांना या प्रकरणांच्या तपासणीसाठी मुंबई आणि बेंगळुरूला पाठविण्यात आले आहे. आतापर्यंतच्या तपासणीत आंबेकर अय्याश असल्याचे पुढे आले आहे. त्याचे मकोकामध्ये आरोपी विवाहितासोबतही संबंध होते. त्याने विवाहितेला मुंबईत फ्लॅट घेऊन दिला आहे. त्याची प्रारंभी विवाहितेच्या पतीसोबत मित्रता होती. पत्नीवर नजर जाताच त्याने तिच्याशी संबंध जोडले. त्याचा विरोध केल्यानंतर ती पतीला आंबेकरच्या मदतीने माराहाण करीत होती.बदनामीच्या भीतीने आंबेकरची तक्रार करण्यास अनेक पीडित अजूनही समोर आलेले नाहीत. बलात्कार प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर चौकशी अधिकारी एपीआय अनुपमा जगताप यांनी न्यायालयात दाखल करून पोलीस कोठडी वाढविण्याची विनंती केली. न्यायालयाने नकार देताना न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठविले. गुरुवारी सोनेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एक कोटीची खंडणी आणि फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयातून प्रॉडक्शन वारंट घेऊन संतोष आंबेकर आणि अरविंद पटेलला अटक करण्यात येणार आहे.या प्रकरणी पोलिसांनी आंबेकरचा भाचा सन्नी वर्माला पूर्वीच अटक केली आहे, तर राम पाटील नामक साथीदार फरार आहे. आंबेकरने गुजरात, वापी येथील व्यापारी हेमंत पटेलची फसवणूक केली आहे. हेमंतची राम पाटील याच्यासोबत ओळख होती. पाटीलने हेमंतची आंबेकरसोबत भेट घडवून आणली होती. आंबेकरने हेमंतला सांगितले की, नेत्यांना नेहमीच दोन हजारांच्या नोटांची गरज असते. मी नेत्यांसाठी काम करतो. त्याने दोन हजाराच्या नोटा घेऊन पाचशेच्या नोटा परत केल्या. त्याने एक कोटीच्या बदल्यात एक लाख रुपये कमिशन देण्याची बतावणी केली. त्यानंतर हेमंतची फसवणूक करण्यात आली.अरविंद पटेल हवाला व्यावसायिक आहे. हेमंतने त्याच्या बालाजी फर्ममध्ये रुपये जमा केले होते. पोलिसांनी अरविंदविरुद्ध मकोकाची कारवाई केली आहे. सोनेगांव प्रकरणी चौकशी अधिकारी अनिल ताकसांडे गुरुवारी न्यायालयातून प्रॉडक्सन वारंट घेऊन आंबेकर आणि अरविंद पटेलला अटक करणार आहे.आताही सक्रिय आहेत भागीदारगुन्हे शाखा पोलिसांनी आंबेकरविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आंबेकरचे अनेक साथीदार आणि भागीदार आताही शहरात सक्रिय आहेत. एक महिन्यानंतरही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग