शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेला ७७ लाखांचा गंडा

By admin | Updated: October 15, 2016 03:05 IST

बँकेकडे तारण ठेवलेली दाल मिलची जागा सरकारी यंत्रणेला (एनएचएआय) अधिग्रहित करण्यास देऊन एका

तारण असलेल्या जागेचे अधिग्रहण : सरकारी यंत्रणेकडून मोबदलाही घेतला नागपूर : बँकेकडे तारण ठेवलेली दाल मिलची जागा सरकारी यंत्रणेला (एनएचएआय) अधिग्रहित करण्यास देऊन एका व्यापाऱ्याने सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या इतवारी शाखेला ७७ लाखांचा गंडा घातला. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर बँकेने अंबे दाल मिल (तेली समाज भवनजवळ, धान्य बाजार, नागपूर) च्या संचालकाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आंद्रेश कुमार असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. तहसील पोलिसांच्या माहितीनुसार, आंद्रेशकुमारने २०१३ ते २०१६ या कालावधीत ही फसवणूक केली. त्याच्या दाल मिलच्या जागेची कागदपत्रे बँकेकडे तारण ठेवून आंद्र्रेशकुमारने ७७ लाखांचे कर्ज उचलले. दरम्यान ही जागा सरकारतर्फे एनएचएआयने अधिग्रहित केली. त्याचा मोबदला म्हणून आंद्रेशकुमारला ३६ लाख, ३३ हजार, ४७५ रुपये सरकारी यंत्रणेकडून मिळाले. मात्र, या रकमेतून बँकेचे कर्ज न फेडता आंद्रेशकुमारने स्वत:च ती रक्कम वापरली. एवढेच नव्हे तर त्याची साधी माहितीही बँकेला दिली नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने बँक प्रशासनाने चौकशी केली असता फसवणूकीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापक शैलेंद्रकुमार श्रीनारायण दास (वय ३२) यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. तहसील पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक झाली की नाही, ते पोलिसांकडून स्पष्ट होऊ शकले नाही.(प्रतिनिधी)