शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

३८५ डॉगीचा ‘एसी’ तून प्रवास

By admin | Updated: June 5, 2015 02:33 IST

कुत्रा म्हटले की या गल्लीतून त्या गल्लीत भटकंती करणारा प्राणी. फिर-फिर फिरून थकला की कुठेतरी विसावा घ्यायचा अन् पुन्हा तीच भटकंती.

दयानंद पाईकराव  नागपूर कुत्रा म्हटले की या गल्लीतून त्या गल्लीत भटकंती करणारा प्राणी. फिर-फिर फिरून थकला की कुठेतरी विसावा घ्यायचा अन् पुन्हा तीच भटकंती. समाजात जसा गरीब आणि श्रीमंत हा वर्ग असतो तसाच काही कुत्र्यांचा ‘क्लास’ हा थोडा वेगळा असतो. हा ‘क्लास’आहे पाळीव कुत्र्यांचा. घरातील सदस्य असल्याने अशा कुत्र्यांची विशेष काळजी घेण्यात येते. फिरायला गेले की त्याला सोबत नेणे, खाण्यासाठी महागडे डॉगफूड या बाबी सर्वांनाच ठाऊक आहेत. परंतु खरी पंचाईत होते ती कुत्रा पाळलेल्या कुटुंबास बाहेरगावी जाताना. आपल्या लाडक्या ‘डॉगी’ला कुठे ठेवावे असा प्रश्न त्यांना पडतो. मागील वर्षी शहरातील ३८५ नागरिकांनी आपल्या कुत्र्यांना एसी डब्याचा प्रवास घडविला. यासाठी रेल्वेला तब्बल ६५ हजारांचे उत्पन्न मिळाले.कुत्रा हा प्राणी अनेकांच्या जिव्हाळ््याचा विषय आहे. घरातील सदस्याप्रमाणे अनेक नागरिक त्याची काळजी घेतात. अनेकांनी घेतला नसेल तो आनंद उपराजधानीतील ३८५ कुत्र्यांनी घेतला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ दरम्यान ३८५कुत्र्यांनी एसी डब्यातून प्रवास करून रेल्वेच्या उत्पन्नात ६५ हजारांची भर घातली. तर ७१ बकऱ्यांनीही रेल्वेने प्रवास करीत रेल्वेला आठ हजारांचे उत्पन्न मिळवून दिले. गोरगरीब अन् श्रीमंतांचे प्रवासाचे सर्वाधिक लोकप्रिय माध्यम म्हणजे रेल्वे. खूपच गरीब व्यक्ती असेल तर तो चालू तिकीट घेऊन जनरल डब्यात चढतो. मध्यमवर्गातला असेल तर तो स्लिपरक्लासचे आरक्षण करतो. त्याहीपेक्षा आर्थिक परिस्थिती उत्तम असणारा एसी थ्री टायरने प्रवास करण्याला पसंती देतो. २०१४ मध्ये ३८५ कुत्र्यांना एसी डब्याचा प्रवास घडला. त्यापोटी रेल्वेला ६५ हजार ९४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात ७१ बकऱ्यांनीही रेल्वेने प्रवास करून रेल्वेला ८ हजार १०७ रुपये मिळवून दिल्याची माहिती आहे. अशी आहे प्रक्रियाकुत्र्याला रेल्वेतून नेण्यासाठी गाडी सुटण्याच्या एक किंवा दोन तास पूर्वी बुकिंग करावी लागते. कुत्र्याला फक्त एसी फर्स्टक्लासने नेता येऊ शकते. या डब्यात वेगवेगळे ‘कुपे’ (कंपार्टमेंट) असल्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत नाही. परंतु एखाद्या प्रवाशाकडे एसी टु टायर, एसी थ्री टायर किंवा स्लिपरक्लासचे तिकीट असेल आणि त्यास आपल्या कुत्र्याला सोबत न्यायचे असेल, तर त्याला गार्डच्या‘ब्रेक व्हॅन’मधील पिंजऱ्यात ठेवावे लागते. ब्रेक व्हॅनमध्ये एखादा ६० किलोचा कुत्रा मुंबईला न्यायचा असेल तर त्यास १०५ रुपये आणि एसी डब्यातून न्यायचा असेल २१० रुपये मोजावे लागतात.