३६० अंश स्कॅनिंगने उलगडणार गुन्ह्यांचे रहस्य, गुन्हे तपासातील डिजिटल क्रांती; नागपूर पोलीस दलाला मिळणार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 01:15 IST2026-04-30T01:15:30+5:302026-04-30T01:15:59+5:30

नागपूर पोलीस दलाला मिळणार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन, अंमली पदार्थांचीदेखील लगेच ओळख पटणार

360 degree scanning will reveal the secrets of crimes, digital revolution in crime investigation; Nagpur Police Force will get a state-of-the-art forensic van | ३६० अंश स्कॅनिंगने उलगडणार गुन्ह्यांचे रहस्य, गुन्हे तपासातील डिजिटल क्रांती; नागपूर पोलीस दलाला मिळणार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन

३६० अंश स्कॅनिंगने उलगडणार गुन्ह्यांचे रहस्य, गुन्हे तपासातील डिजिटल क्रांती; नागपूर पोलीस दलाला मिळणार अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन


नागपूर : अंमली पदार्थांसह गंभीर गुन्ह्यांच्या तपासात अचूकता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी नागपूरपोलिसांना लवकरच अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या व्हॅनमधील थ्री डी डिजिटल मॉडेलिंग तंत्रज्ञान हे तपास प्रक्रियेला पूर्णपणे नवे वळण देणार आहे. यामुळे प्रत्यक्ष घटनास्थळाचे ३६० अंशात स्कॅनिंग करणे शक्य होणार आहे. या व्हॅनमुळे पुरावे एकत्रित करण्यासाठी मदत मिळणार आहे.

भारतीय न्याय संहितेत गुन्ह्यांमधील ई-पुराव्यांना अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सातत्याने प्रगत न्यायसहायक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या आहेत. प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणासह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनही राज्य पोलिस दलाच्या दिमतीला देण्यात येण्यात आल्या आहेत. सध्या राज्यभरात तब्बल २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तैनात करण्यात आल्या असून त्यात ८ आधुनिक व्हॅनचा समावेश आहे. न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाने अतिरिक्त फिचर्स असलेल्या दोन अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन मुंबई आणि नागपूरसाठी उपलब्ध केल्या आहेत. यातील एक व्हॅन नागपुरात दाखल झाली असून त्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. ते पूर्ण होताच ती नागपूर शहर पोलिसांना देण्यात येणार आहे.

एफटीआर आणि थ्री डी तंत्रज्ञानाचा समावेश
या व्हॅनमध्ये दोन अतिरिक्त फिचर्स पुरविण्यात आली आहेत. त्यात प्रामुख्याने अंमली पदार्थांची प्राथमिक स्वरुपात ओळख पटविणाऱ्या एफटीआर उपकरणांचा समावेश आणि संपूर्ण घटनास्थळाचे त्रिमितीय डिजिटल मॉडेल उपलब्ध करणाऱ्या कॅमेरा फिचर्सचा समावेश आहे. या व्हॅनमध्ये उपलब्ध अत्याधुनिक कॅमेरांच्या सहाय्याने कुठल्याही महत्त्वाच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष घटनास्थळाचे ३६० अंशात स्कॅनिंग करणे शक्य होणार आहे. या थ्री डी डिजिटल चित्रणात घटनास्थळाचे नेमके लोकेशन, दृश्य, अचूक मोजमाप, घटनास्थळावरील वस्तू अशा सर्व प्रकारच्या डिजिटल नोंदी घेणे शक्य होईल. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच तांत्रिक तपासात संपूर्ण पारदर्शकता येईल व नोंदी डिजिटल स्वरुपात साठविल्या जातील. अगदी घटनास्थळापासून ते प्रयोगशाळेपर्यंतच्या साऱ्या घडामोडी टिपता येणे शक्य होणार आहे. घटनास्थळावरील प्रत्येक गोष्ट ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षितपणे साठवली जाते. त्यामुळे पुराव्यांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता पूर्णपणे टाळता येईल अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक न्यायसहायक प्रयोगशाळेच उपसंचालक अश्विन गेडाम यांनी दिली.

जागेवरच अंमली पदार्थांची ओळख पटणार
एखाद्या व्यक्तीकडे आढळून आलेला संशयित पदार्थ अंमली पदार्थ आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी त्याला जप्त करून न्यायसहायक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जाते व त्याचा अहवाल आल्यानंतर पोलिसांची कारवाई सुरु होते. मा६ आता या व्हॅनमुळे घटनास्थळावरच ओळख पटविणे करणे शक्य होणार आहे

Web Title : नागपुर पुलिस को अपराध सुलझाने के लिए मिलेगा उन्नत फोरेंसिक वैन

Web Summary : नागपुर पुलिस को जल्द ही 360-डिग्री स्कैनिंग और 3डी मॉडलिंग से लैस अत्याधुनिक फोरेंसिक वैन मिलेगी। यह तकनीक अपराध स्थलों के सटीक डिजिटल दस्तावेजीकरण को सक्षम करके अपराध जांच में क्रांति लाएगी। वैन में मौके पर ही ड्रग की पहचान करने की सुविधा भी है, जिससे जांच दक्षता और सबूत सुरक्षा बढ़ेगी।

Web Title : Nagpur Police to Get Advanced Forensic Van for Crime Solving

Web Summary : Nagpur police will soon receive a state-of-the-art forensic van equipped with 360-degree scanning and 3D modeling. This technology will revolutionize crime investigations by enabling precise digital documentation of crime scenes. The van also features on-site drug identification, enhancing investigation efficiency and evidence security.