शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
4
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
5
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
6
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
7
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
8
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
9
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
10
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
11
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
12
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
13
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
14
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
15
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
16
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
17
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
18
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
19
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
20
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ६० हजारांत २ महिन्यांच्या मुलीचा केला सौदा

By योगेश पांडे | Updated: January 20, 2023 11:11 IST

बाळ खरेदी-विक्रीतील रॅकेटमधील आणखी एका मुलीचा शोध

नागपूर : संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या बाळ खरेदी-विक्री रॅकेटमध्ये आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नागपुरातून एक बाळ पळविणाऱ्या प्रजापती दाम्पत्याने स्वत:च्याच दोन महिन्यांच्या मुलीचा अवघ्या ६० हजारांत सौदा केला होता. संबंधित मुलीला नागपुरातच विकले होते. संबंधित मुलीची पोलिसांनी सुटका केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात आठ महिन्यांच्या बाळाच्या अपहरणानंतर या रॅकेटचा भंडाफोड झाला होता. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीत अनेक नवनवीन खुलासे समोर आले. या रॅकेटमध्ये एका तथाकथित डॉक्टरचादेखील सहभाग असल्यामुळे या रॅकेटची व्याप्ती फार मोठी असल्याची बाब स्पष्ट झाली. या टोळीने गुजरात, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतदेखील निपुत्रिक दाम्पत्यांना बाळांची विक्री केली होती. त्यातही अनेकांना दत्तक प्रक्रियेअंतर्गत बाळ दिल्याची थाप मारली होती व त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. या प्रकरणाची पोलिसांकडून अद्यापही पाळेमुळे खणण्यात येत असून, गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

योगेंद्रकुमार प्रजापती व त्याची बायको रिता यांची चौकशी करण्यात येत असता, त्यांनी जुलै महिन्यात त्यांची २ महिन्यांची मुलगी विकल्याची बाब कबूल केली. तिचा जन्म भंडारा जिल्हा रुग्णालयात झाला होता. त्यांनी फरजाना ऊर्फ अंजुम कुरेशी, सीमा परवीन अन्सारी, आएशा खान, सचिन पाटील यांच्यामार्फत मुलीचा सौदा केला. मात्र मुलगी कुणाला विकली याबाबत आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. खबऱ्यांच्या माध्यमातून संबंधित मुलीची विक्री यशोधरानगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धम्मदीपनगर येथे झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित घरी जाऊन चौकशी केली असता, मुलगी तेथे आढळून आली. पोलिसांनी प्रजापती दाम्पत्यासह इतर चारजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दत्तक देण्याच्या नावाखालीच विक्री

पोलिसांनी संबंधित महिलेची विचारपूस केली असता, तिने आरोपींनी दत्तक देण्याच्या नावाखालीच ६० हजार रुपये घेतल्याचे सांगितले. प्रक्रियेला वेळ लागत असल्याने तुम्ही मुलगी ठेवून घ्या, असे तिला सांगण्यात आले व ऑक्टोबर महिन्यात मुलगी सोपविण्यात आली. या रॅकेटमध्ये बहुतांश मुलांची विक्री दत्तक प्रक्रियेच्या नावाखालीच झाली आहे.

रॅकेटमधील बारावा गुन्हा

संपूर्ण विदर्भाला हादरविणाऱ्या बाळ खरेदी-विक्रीच्या रॅकेटची पाळेमुळे विविध राज्यांतदेखील पसरली होती. या रॅकेटमध्ये पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांत ११ गुन्ह्यांची नोंद केली होती व पाच गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बुधवारी दाखल झालेला गुन्हा बारावा ठरला. या रॅकेटमध्ये आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHuman Traffickingमानवी तस्करीnew born babyनवजात अर्भकnagpurनागपूर