शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या रुग्णांसाठी १२०० बेड्‌स उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST

- ५ हजार ऑक्सिजन सिलिंडर, - २ हजार व्हेंटिलेटर लवकरच नागपुरात - वर्धा येथे होणार रेमडेसिविरचे उत्पादन नागपूर : ...

- ५ हजार ऑक्सिजन सिलिंडर,

- २ हजार व्हेंटिलेटर लवकरच नागपुरात

- वर्धा येथे होणार रेमडेसिविरचे उत्पादन

नागपूर : शहरातील कोविड रुग्णांची उपचारांअभावी होणारी परवड लक्षात घेता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२०० अतिरिक्त बेड्‌स उपलब्ध करून देण्याचे निर्देश शुक्रवारी मनपा आणि एम्सच्या डॉक्टरांना दिले. त्यामुळे आता शहरात मेयोत १००, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल १००, एम्स रुग्णालय ५०० आणि मनपाच्या रुग्णालयांमध्ये ३०० अतिरिक्त बेड्‌सची व्यवस्था तातडीने करण्यात येत आहे. तसेच ऑक्सिजनविना आणि व्हेंटिलेटरविना रुग्ण दगावत आहेत. लवकरच शहरात ५ हजार ऑक्सिजन सिलिंडर आणि २ हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होत आहेत.

बैठकीत महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन्‌ बी, महापौर दयाशंकर तिवारी, आ. प्रवीण दटके, एम्सचे डॉ. मनीष श्रीगिरीवार, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके उपस्थित होते.

निर्णयार्थ

एम्समध्ये ५०० बेड्‌स ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्ससह तातडीने उपलब्ध करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले. यासाठी महापालिका बेड्‌स आणि आवश्यक साहित्य एम्सला देण्यास तयार आहे. मेयो, मेडिकलसह महापालिकेने आपले स्वत:चे ऑक्सिजन प्लॅन्ट उभे करण्यास त्वरित कारवाई करावी, यादृष्टीने गडकरी यांनी प्लॅन्टसंबंधी तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली. खासगी रुग्णालयांमध्ये बेड्‌स वाढवावेत यासाठी आवाहन करा व त्यांना बेड्‌स वाढविण्यासाठी त्वरित परवानगी देण्याचे निर्देश दिले. यासोबतच मनपाच्या ऑक्सिजन प्लॅन्टची क्षमता वाढविता येते काय, याद़ृष्टीनेही प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयनॉक्स ही कंपनी ८५ टक्के ऑक्सिजन तयार करीत आहे. या कंपनीच्या पुरवठ्यावर सध्या नागपूर सुरू आहे. महापालिकेच्या जागेवर कुण्या एजन्सीला त्वरित प्लॅन्ट उभा करणे शक्य आहे काय, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तसेच रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी वर्धा येथील क्षीरसागर यांच्या कंपनीला गडकरी यांनी औषध उत्पादनाची मान्यता मिळवून दिली. उद्यापासून या फॅक्टरीमधून रेमडेसिविरचे उत्पादन सुरू होऊ शकते.