शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

म्युच्युअल फंडात पैसे कुणी गुंतवावेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 10:03 IST

म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार, रोखे बाजार यामध्ये गुंतवणूक करण्याचा राजमार्ग होय.

पैसा कमावणे हे जेवढं कठीण काम एवढच मिळालेला पैसा कुठे गुंतवायचा? हे दुसरं कठीण काम!  बरं आपण गुंतवलेला पैसा हा ज्याच्याकडे देतोय , ज्या कंपनीत गुंतवतो ती अधिकृत आहे ना?  का तुमचे पैसे परस्पर घेऊन कोणीतरी लंपास होणार आहे? या सगळ्यापासून दूर जावं आणि पैसे एखाद्या बँकेत गुंतवावेत तर ही बँक बुडेल की काय अशी शंका! राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे ठेवले तर त्या बँका सरकारी असल्यामुळे पैसे बुडत  नाहीत पण मिळणारे व्याज कमी, त्यांनी आपली गरजही भागत नाही!

अशावेळी एक हक्काचा साथीदार आपल्या मदतीला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड!

म्युच्युअल फंडात कुणी पैसे गुंतवावेत?

म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार, रोखे बाजार यामध्ये गुंतवणूक करण्याचा राजमार्ग होय. शेअर बाजारात थेट पैसे गुंतवायची जोखीम घ्यायला बरेच जण घाबरतात. बऱ्याच वेळेला त्यांना शेअर बाजाराचं ज्ञान नसतं. नक्की काय वाचायचं?, कुठे वाचायचं?, कसं समजून घ्यायचं?  हे सुद्धा माहित नसतं. अशा वेळेला म्युच्युअल फंड तुमच्या मदतीला येतात. एका तज्ञ माणसाच्या हाताखाली एक टीम काम करते आणि तुमचा पैसा तुम्हाला अपेक्षित असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवला जातो. म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे! कोणीही! हो!

अगदी 18 वर्षे पूर्ण झालेली असोत किंवा नसो. पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर कोणताही भारतीय नागरिक, कंपनी, संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, पार्टनरशिप फॉर्म अशा सगळ्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. जर गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने गुंतवणूक करत असेल आणि ज्याच्या नावाने गुंतवणूक करायची ती व्यक्ती सज्ञान नसेल तर जॉईंट स्वरुपात सुद्धा गुंतवणूक करता येते.

वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता.

 

टॅग्स :Knowledge Centerज्ञानाचं केंद्रbusinessव्यवसायMONEYपैसा