शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

म्युच्युअल फंडात किती रक्कम गुंतवू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 11:09 IST

तुम्हाला अशी शंका आहे का की  म्युच्युअल फंड फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे? तर अजिबात नाही! हा तुमचा गैरसमज आहे. प्रत्येक महिन्याला कमीतकमी अगदी रुपये पाचशे एवढ्या छोट्याशा रकमेपासून तुम्ही  गुंतवणूक सुरू करू शकता.

एकदा म्युच्युअल फंडाचा फंडा डोक्यात फिक्स झाला की मग अजिबात मागे वळून पाहायला नको. तुमच्या प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. दोन तरुण मुलं एकाच ऑफिसमध्ये काम करतात, पण एकाला त्याच्या बहिणीचे लग्न दोन-तीन वर्षांनी होणार आहे त्यासाठी पैसे हवेत, तर दुसऱ्याला एक झकास टू व्हीलर घ्यायची आहे! एखाद्या काकांना रिटायरमेंट झाल्यावर मस्त गावाला घर बांधायचंय! एका श्री आणि सौ ना निवांत युरोप टूर वर जायचंय ! या सर्वांसाठी म्युच्युअल फंड योजना लाभदायक ठरू शकतात.

म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणूक करता येते किंवा ठरावीक महिन्याच्या अंतराने गुंतवणूक करता येते.

तुम्हाला अशी शंका आहे का की  म्युच्युअल फंड फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे? तर अजिबात नाही! हा तुमचा गैरसमज आहे.

प्रत्येक महिन्याला कमीतकमी अगदी रुपये पाचशे एवढ्या छोट्याशा रकमेपासून तुम्ही  गुंतवणूक सुरू करू शकता.  जर एकरकमी पैसे गुंतवायचे असतील तर काही फंडांमध्ये एक हजार  तर काही फंडांमध्ये पाच हजार रुपये सुरुवातीला गुंतवावे लागतात.  तुम्ही फंडात पैसे गुंतविले की तुमच्या नावाचा एक फोलिओ तयार होतो.

हा फोलिओ म्हणजे थोडक्यात म्युच्युअल फंड कंपनीकडे असलेलं तुमचं खातं असं  समजूया. आता एखाद्याने फंडात सुरुवातीला पाच हजार रुपये गुंतवले, काही महिन्यांनी त्याला पुन्हा पैसे गुंतवायचे पण पाच हजार रुपये त्याच्याकडे नाहीयेत. काही हरकत नाही !  एकदा फोलिओ उघडला की त्यानंतर कमीत कमी एक हजार रुपये पुन्हा गुंतवायची सोय आहे. काही फंडांमध्ये तर तुम्ही एका वेळी अगदी पाचशे रुपये सुद्धा गुंतवू शकता ! म्हणजे थोडक्यात काय पैसे गुंतवायचे असतील तर  भरपूर  इच्छा हवी  पैसे थोडेसे कमी असले तरी चालतात !

तुम्हाला टॅक्स वाचवायची इच्छा आहे का?

अर्थातच टॅक्स वाचवायची इच्छा कुणाला नसते म्हणा ! मग तुम्ही तुम्हाला किती रुपये टॅक्स सेव्हिंग मध्ये हे गुंतवावे लागतात याची माहिती करून घ्या. प्रत्येकाला आपापल्या इनकमच्या अनुसार कमी जास्त टॅक्स पडतो. अशावेळी एकदा किती रुपये गुंतवायचे हे कळलं की टॅक्स बचत करून देणाऱ्या म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही तेवढी रक्कम वर्षभरात गुंतवा.  समजा एखाद्याला एका वर्षात पन्नास हजार रुपये कर वाचवण्यासाठी गुंतवावे लागणार असतील तर त्या व्यक्तीने ते पैसे त्याच्या सोयीनुसार व बाजारातील परिस्थितीनुसार गुंतवावेत.

दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवायची तुमची इच्छा आहे का? अशा सिस्टिमॅटिक लोकांसाठी एक प्लान आहे याला म्हणतात एस आय पी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. 

टॅग्स :Knowledge Centerज्ञानाचं केंद्रbusinessव्यवसायMONEYपैसा