joke on it culture | अस्सा हवा नातजावई, आजीबाईंना भलतीच घाई!
अस्सा हवा नातजावई, आजीबाईंना भलतीच घाई!

काल एका लग्नाला गेलो होतो. सहज पाहुण्यांसोबत गप्पा मारत होतो.

शेजारी एक आजीही बसल्या होत्या.
सहज म्हणाल्या, 'माझी नात देखणी आहे, शिकलेली आहे, एकांदं स्थळ बघा!'

मी म्हणालो, 'शिक्षक चालेल का?'

आजी रागाने म्हणाली:- नगं, माझं दोन जावई मास्तर हाईत. सुट्टी पडल्यापासून हितच हाइत.  मेल्यांनी सासूरवाडीची शाळा करून टाकलीय. जरा IT वाला बघा. सकाळी सासुरवाडीला येतंय आन् संध्याकाळी Issue हाय म्हणून निघून जातय.
😳😳😳
 

Web Title: joke on it culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.